आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आळंदी ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात होते.
जागतिक एड्स निर्मूलन दिना निमित्त एक दिवसीय आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संचालक मयूर ढमाले, आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, डॉ. श्रीनिवास कोलोड, आरोग्य निरीक्षक एच. बी. कुलकर्णी, दिपाली लोंढे उपस्थित होते.
जागतिक एड्स निर्मूलन दिना निमित्त एक दिवसीय आरोग्य कार्यशाळेत प्रमुख वक्त्या डॉ.उर्मिला शिंदे यांनी एडस जनजागृती व आरोग्य विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एडस हा आजार एडस हा आजार कोणत्या कारणांनी होतो या संदर्भात त्यांनी माहिती देत खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. या आजाराची लक्षण कोणती आणि आपल्या आरोग्याची आपण काळजी कशी घेतली पाहिजे या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दंत वैद्य चिकित्सक डॉ. विद्या कांबळे यांनी दातांची काळजी कशी घ्यावी. दात घासण्याची योग्य पद्धत कोणती तसेच दातावरून तसेच हिरड्यावरून एड्स ची लक्षणे कोणती या संदर्भात माहिती दिली.
प्राचार्य डॉ. हंसराज थोरात सर यांनी एड्स आणि मानवी आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतामधून मोक्षगुण्डम विश्वेसरय्या यांचे आरोग्या विषयीचे महत्वाचे उदारण देऊन आपण आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजीव कांबळे यांनी केले. आभार डॉ. रणजित कदम यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनाने झाला. सांगता पसायदान गायनाने झाली.