KARAJATPachhim MaharashtraPolitics

बाळासाहेबांची शिवसेनेच्या कर्जत तालुकाप्रमुखपदी बापूसाहेब नेटके

कर्जत (प्रतिनिधी) : बाळासाहेबांची शिवसेनेच्या कर्जत तालुकाप्रमुखपदी कर्जतमधील बापूसाहेब नेटके यांची निवड करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेटके यांचे स्वागत केले. यावेळी अहमदनगर दक्षिणचे जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या बापूसाहेब प्रभाकर नेटके यांनी आपल्या कार्यकर्त्यासह आ.रोहित पवार यांना बाय बाय करत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नेटके यांना जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांचे उपस्थितीत कर्जत तालुकाध्यक्ष पदाचे पत्र देऊन लोकहितासाठी पक्षाचे काम करण्याची व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी काम करताना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या. नेटके बरोबर कर्जत तालुका उपप्रमुखपदी सुभाष अंबादास धस रा.बेलगाव (मिरजगाव) ता.कर्जत यांची ही नियुक्ती करण्यात आली.
नेटके हे कर्जत तालुक्यात मेजर म्हणून प्रसिद्ध असून, त्याच्या पत्नी भाजपाकडून एकमेव पंचायत समिती सदस्या असताना त्यांनी उपसभापती होण्याची किमया साधली होती, तर स्वत: नेटके मेजर यांनी ही कर्जत नगरपंचायतमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्याच्या राजकीय कारकीर्दीत अत्यंत मितभाशी स्वभावामुळे त्याच्या तालुक्यात व कर्जत शहरात चांगला जनसंपर्क असून बाळासाहेबांच्या शिवसेनेस त्याच्या रूपाने सुपरिचित चेहरा मिळाला आहे. तालुक्यात त्यांचे खूप नातेसंबंध व मोठा मित्रपरिवार आहे. त्याचा शिवसेने मजबुतीसाठी नक्कीच उपयोग होईल. पोलीस सेवेतील २२ वर्षाच्या अनुभवामुळे त्याची अधिकारी व कर्मचारी वर्गाशी चांगली जवळीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!