सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्राम सवडद येथे आदर्श गाव योजनेअंतर्गत बचत गट व भूमिहीन शेतकर्यांना लघु व्यवसायासाठी आर्थिक खेळते भांडवल वाटप करण्यात आले. सदर योजना ही एक वर्षापासून सुरू झालेली असून, योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. गावातील ३८ बचत गटांना व २१ भूमिहीन लोकांना लघु व्यवसायासाठी शासनाच्या माध्यमातून खेळते भांडवल देण्यात आले.
राज्य सरकारच्या या योजनेचे आदर्श गाव योजनेचे पोपटराव पवार हे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आदर्श गाव योजनेमध्ये सवडद या गावाची निवड झाली होती. त्या योजनेअंतर्गत गावातील बचत गट व भूमिहीन लोकांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी गावातील सरपंच शिवाजीभाऊ लहाने, संस्थाध्यक्ष गजूभाऊ मुंडे, कृषी अधिकारी बंगाळे साहेब, तंत्र अधिकारी नागरे साहेब यांच्याहस्ते ३८ बचत गट व २१ भूमिहीन यांना लघु व्यवसाय करता खेळते भांडवल सवडत येथे वाटप करण्यात आले. त्यावेळी गावातील बहुसंख्या महिला मंडळी व पुरुष मंडळी कार्यक्रमाला हजर होते.