मिसाळवाडीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांवर अभिनंदनांचा वर्षाव!
चिखली (एकनाथ माळेकर) – मुलींच्या सर्वोत्तम जन्मदरामुळे राज्यभर नावलौकिक पावलेल्या मिसाळवाडी या गावाच्या ग्रामस्थांनी विद्यमान सरपंच विनोद तथा बाळू पाटील यांची सरपंचपदी पुन्हा एकदा बहुमताने बिनविरोध निवड केली, तसेच उपसरपंचांसह सदस्यांचीदेखील सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली असून, प्रशासकीय घोषणेची फक्त औपचारिकता उरली आहे. बाळू पाटील यांच्या या निवडीबद्दल सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्यात. गावातील सर्व मान्यवर व ग्रामस्थांनीदेखील प्रत्यक्ष भेटून, फोन व सोशल मीडियाद्वारे नवनियुक्त सरपंचांसह सदस्य व पदाधिकारी यांच्यावर अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव केला होता.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुलभाऊ बोंद्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधावत, शेतकरी संघटनेचे नेते भानुदास घुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वांसह, मिसाळवाडीचे भूमिपुत्र असलेले परंतु, वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदस्थ असलेल्या गावातील मान्यवरांनीदेखील अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यात प्रामुख्याने बुलढाणा वित्त विभागातील लेखा व वित्त संचालक दिनकर बावस्कर, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती बळीराम मिसाळ, ज्येष्ठ संपादक व ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे अध्यक्ष, ईव्ही डील या इलेक्ट्रिक वाहन, चार्जिंग स्टेशन वितरक कंपनीचे सहसंचालक पुरुषोत्तम सांगळे, आदर्श मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ, माजी सरपंच तेजराव मिसाळ, माजी सरपंच देवीदास मिसाळ (साधुबुवा), माजी मुख्याध्यापक विष्णू मिसाळ गुरुजी, गणपत गुरुजी, माजी पोलिस पाटील हनुमान मिसाळ, संजय भगत, मुख्याध्यापक चंद्रभान मिसाळ, तुकाराम भगत, अशोक पाटील, सुधाकर पाटील, बंडू पाटील, प्रकाश पाटील, रमेश कोलते, विजय कोलते, काशिनाथ कोलते, शिवदास मिसाळ, मधुकर सावकार, देविदास सावकार, शेणफड काकडे, शेणफड मिसाळ, नारायण गुरुजी, कृषीतज्ज्ञ शशिकांत अण्णा मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते सुनील मिसाळ, गजानन मिसाळ, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शिनगारे ताई, सुभाष शिनगारे, गुलाबराव सुरडकर, किशोर सुरडकर, जगदेव सुरडकर, शाम भगत, संतोष भगत, माजी सरपंच परमेश्वर मिसाळ, तुकाराम मिसाळ, शरद कोलते, शरद दौंड, रामकृष्ण मिसाळ, अनंता मिसाळ, सुरेश भगत, निवृत्ती झाल्टे आदींसह गावातील ज्येष्ठ नागरिकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या असून, गावविकासासाठी चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सर्वांनी केलेल्या अभिनंदनाचा विनम्रपूर्वक स्वीकार करत आहोत. ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास व राजकीय विरोधकांनीदेखील मैत्रीपूर्ण वातावरणात दिलेली साथ, यामुळे मिसाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली. मागील पंचवार्षिकमध्ये चांगल्या प्रकारे विकासकामे करता आलीत. आतादेखील सर्वांना सोबत घेऊन विकासकामे उभी करता येतील. निवडणुकांमध्ये गावातील कौटुंबीक वातावरण खराब होते, असा अनुभव आहे. आपलीच माणसे एकमेकांच्या विरोधात उभी राहतात, आणि मने खराब होतात. बिनविरोध निवडणुकीमुळे कुणाची मने दुखावली जात नाहीत. मिसाळवाडी गावाचा इतर गावांनीही आदर्श घ्यावा व आपआपल्या ग्रामपंचायतीदेखील बिनविरोध कराव्यात.
– विनोद तथा बाळू पाटील, सरपंच मिसाळवाडी
—————-