Aalandi

रोहिदास महाराज पुण्यतिथीदिनी अभिवादन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील नेचर फाउंडेशन, आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहत विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी नारायण धस यांचे हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, विश्वस्त माऊली घुंडरे पाटील, भाईचारा फाउंडेशनचे अध्यक्ष सुलतान शेख, विधितज्ञ निलेश वेताळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!