– एकमेव निर्भिड, व रोखठोक पत्रकारितेचा अखेर ‘सिस्टेमॅटिक’ बळी!
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी कालच वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. आज रवीश कुमार यांनी राजीनामा दिला. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीत रवीश कुमार यांचे हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम हे कार्यक्रम लोकप्रिय झाले. कंपनीनेदेखील रवीशकुमार यांचा राजीनामा स्विकारला असून, तो तात्काळ प्रभावाने लागू होईल, असे सांगितले आहे. रवीश कुमार यांना पत्रकारितेच्या योगदानासाठी रामनाथ गोयंका उत्कृष्टता पत्रकारिता पुरस्कार आणि २०१९ साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी काल वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. आज रवीश कुमार यांनी राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून रवीश कुमार राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आज त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिला आणि पत्रकारिता जगतात एकच खळबळ उडाली. तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याासाठी रवीश कुमार ओळखले जातात. पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दोनदा प्रतिष्ठित रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नालिझम अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणार्या रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने त्यांना सन २०१९ मध्ये सन्मानितही करण्यात आले आहे. कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरील घडामोडीत आरआरपीआर होल्डिंगच्या शेअर्सच्या हस्तांतरणामुळे अदानी समूहाला एनडीटीव्हीमध्ये २९.१८ टक्के हिस्सा मिळणार आहे. यांसह अदानी समूहाकडून ५ डिसेंबरला अतिरिक्त २६ टक्के समभागासाठी खुली ऑफर दिली आहे.