नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ खेडेकर हे जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा जनसंवाद दौर्यावर असताना नांदुरा येथे काल (दि.२७) आले असताना नाशिक येथे होऊ घातलेला संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिवस याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले, व आजपर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेऊन आगामी निवडणुकांना कसे सामोरे जावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संभाजी ब्रिगेडच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ करत संभाजी ब्रिगेडचे विनोद वनारे यांच्यापासून सुरुवात केली.
या बैठकीला संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री योगेशदादा पाटील यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा, असे सांगत सदस्य नोंदणी करण्याचे आदेश दिले. यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी आजपर्यंत १० वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. यामधे शेतकर्यांसाठी केलेलं अनेकानेक आंदोलने, ज्वलंत सामाजिक मुद्दे हाती घेऊन कसे मार्गी लावले, तसेच दैनंदिन जीवनात लोकांच्या अडचणी सोडविण्याचा कसा सपाटा सुरू आहे, हे सांगितले. यावेळी संजू पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके, तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संपर्कप्रमुख सचिन गणगे, तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रदीप कुटे, तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके, नांदुरा शहराध्यक्ष हिमांशू अवचार, शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर, संतोष गायगोळ, भोटा शाखाध्यक्ष विनायक पारस्कार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके, अमोल क्षीरसागर, संतोष देशमुख, अभिषेक सोळंके, पत्रकार पवन चव्हाण व इतर उपस्थित होते.