चिखली (विशेष प्रतिनिधी) – महिला पतंजली योग समितीच्यावतीने आयोजित योग विज्ञान शिबिरात योगगुरू रामदेवबाबा यांनी महिलांना संबोधित करतांना समोर हजारो महिला असतांना संस्कृती विसरून असभ्य असे उद्गार काढले, ज्यामुळे महिला व जनसामान्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविले की, रामदेव बाबाचे वक्तव्य असभ्यतेचे शिखर गाठणारे आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा पतंजलीच्या उत्पादनाची होळी करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
महिला साड्या नेसून पण चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या दिसतात, तर माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे असभ्य वादग्रस्त वक्तव्य रामदेवबाबा यांनी महिलांबद्दल केल्याने त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महिलांचा अपमान झाला आहे, बेताल वक्तव्य करणार्या अश्या लोकांना कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणे करुन भविष्यात महिलांचा अपमान होणार नाही. आपल्या अकलेचे तारे तोडून बेताल वक्तव्य करणार्या रामदेवबाबा यांच्यावर महाराष्ट्र सरकारने तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, रामदेवबाबा यांनी संपूर्ण देशातील महिलांचे त्वरित माफी मागावी,
निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास रामदेवबाबा यांचे पतंजली उत्पादनाचे बायकॉट करून त्याच्या पतंजलीनिर्मित उत्पादनाची होळी करण्यात येईल, सदर निवेदन देतांना रिपब्लीकन सेना जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा कामगार अध्यक्ष रहमान खान, चिखली तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, चिखली तालुका युवा उपाध्यक्ष शेख वसीम, चिखली शहर उपाध्यक्ष रमेशभाऊ अंभोरे, चिखली शहर युवा अध्यक्ष शेखमालीक, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, चिखली शहर उपाध्यक्ष युवा अप्पू खान, दीपक तायडे, देवाभाई शिरसागर, अरुण जाधव, सौरभ बावस्कर, शेख दानिश, अजय जाधव व इतर पदाधिकारीसह कार्यकर्ते उपस्थित होते.