आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी जनहित फाउंडेशन,नेचर फाउंडेशनचे वतीने आद्य महिला सेनानी क्रांतिकारक भीमाबाई होळकर आणि थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन, पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचे आळंदी शहर संघटन सरचिटणीस भागवत काटकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश धनवे पाटील, सामाजिक कार्यकर्ते गोविंद ठाकूर तौर, भाईचारा फाउंडेशनचे अध्यक्ष सुलतान शेख, जनहितचे विश्वस्त माऊली घुंडरे आदी उपस्थित होते. यावेळी भागवत काटकर यांनी मार्गदर्शन केले. आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने आळंदी इंटरसिटी सर्व्हिसेसच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.