Breaking newsHead linesWorld update

क्रूरकर्मा आफताब पुनावाला बचावला, सशस्त्र तरुणांचा नंग्या तलवारीनिशी हल्ला!

– श्रद्धा वालकर हत्याकांड : हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – श्रद्धा वालकर हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पूनावालाला घेऊन जाणार्‍या पोलिसांच्या व्हॅनवर दिल्लीत संतप्त जमावाने सशस्त्र हल्ला केला. त्याला गाडीच्या खाली खेचून तलवारीने कापून काढण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या हल्ल्याची जबाबदारी हिंदुत्ववादी संघटना हिंदू सेनेने स्वीकारली असून, दिल्ली पोलिसांनी काही तरुणांना अटक केली आहे.

जवळपास १५ जणांच्या संतप्त जमावाने तलवारी, घातक शस्त्रांनिशी आरोपी आफताबवर जीवघेणा हल्ला केला. त्याला पोलिसांच्या ताब्यातून ओढून काढत तलवारीने चिरून टाकण्याचा प्रयत्न झाला. हल्ला करणार्‍यांमधील एका आरोपीचे नाव निगम गुर्जर असे आहे. हल्लेखोरांना हल्ला करून आफताबची हत्या करायची होती. पोलिसांनी एक मारुती व्हॅन आणि तलवारी जप्त केल्या असून, या हल्ल्याची जबाबदारी हिंदू सेनेने स्वीकारली आहे. तर हल्ला करणारे गुडगावचे रहिवासी आहेत.

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अफताब पुनावाला याची आज पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये नेले जात होते. या दरम्यान १५ ते २० जणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन अफताबवर हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु, धोका लक्षात येताच पोलिसांनी त्याला तातडीने पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. त्यामुळे संतप्त जमावाने त्या व्हॅनवर तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी यावेळी त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त जमावाने पोलीस व्हॅनवरही दगडफेक केली.

ज्याने हल्ला केला तो म्हणाला, त्याला दोन मिनिटांसाठी बाहेर काढा, मी त्याला मारून टाकेन. आफताबच्या गाडीवर हल्ला करणार्‍या काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून तलवारी जप्त केल्या आहेत. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमाच्या काही प्रतिनिधींनी हल्ला करणार्‍या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अफताबवर असलेला संताप व्यक्त केला. आज सुटला पण एक दिवसतरी त्याला कापून काढू, अशा इशारा यावेळी संतप्त तरुणांनी दिला.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!