चिखली (शहर प्रतिनिधी) – येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसीच्या अकरा कॅडेटची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून, या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. आयुष्यात जीद्द ठेवली, तर आपण आयुष्यातील कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते, असे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले.
भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या कॅडेटमध्ये मंगेश पाबळे, शंकर जायभाये, अन्सार शेख, शेषराव सुरकुटे, अंकुश कोकाटे, सागर वाकोडे, निलेश भुसारी, किरण घेवंदे, तुषार जाधव, अभिषेक गोफणे, सचिन वानखेडे यांची औरंगाबादमधील अग्निवीर भरतीमध्ये भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख, आयक्यूएसी समन्वयक डॉ.वनिता पोच्छी, लेफ्टनंट किरण पडघान यांनी अभिंनदन केले व प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वतःचे अस्तित्व उभे करण्यासाठी एनसीसी आहे. आयुष्यात ध्येयाचा पायंडा ठेवला, तर आपण आयुष्यातील कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते. आपल्या आयुष्यात जोश आणि जीद्द असेल, तर कोणत्याही अडचणींचा सामना आपण करू शकतो. या यशात आई-वडिल व प्राध्यापकांचे योगदान असल्याचे सांगून, देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावे, असे आवाहन प्राचार्य देशमुख यांनी याप्रसंगी केले आहे.
——————–