आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संविधाना बाबत नागरिकांत जनजागृती करण्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा तसेच विचारांचा प्रचार, प्रसार सर्वत्र होण्यासाठी त्यांच्या कार्याची आठवण म्हणून, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने आळंदीत २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला.
युवक तरुण, नागरिक, शालेय मुले यांच्या मध्ये संविधानाची मूल्य रुजविण्या करता हा दिवस साजरा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आळंदीत विविध सेवाभावी संस्थानच्या वतीने उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविकाचे नागरिकांना माहितीसाठी तसेच विविध ठिकाणी संविधान दिना निमित्त संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचनासाठी संविधान प्रास्ताविक पत्रक उपलब्द्ध करून देऊन वाटप करण्यात आले.
आळंदीतील संत ज्ञानेश्वर ऑटोरिक्षा संघटना, टपरी पथारी पंचायत अंतर्गत माऊली भाजी मंडईसह परिसरातील व्यावसायिक, विक्रेते, नागरिक यांना संविधान पत्रकांचे वाटप करून वाटप करण्यात आले. क्रांती पार्क स्मारक जवळ देखील संविधान वाचन करून जनजागृती करण्यात आली. आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, भाईचारा सोशालिस्ट फाउंडेशन सुलतान शेख यांचे वतीने सामूहिक वाचनासाठी संविधान प्रास्ताविक पत्रकांचे वाटप विविध ठिकाणी करण्यात आले. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ नागरिक आणि मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आले होते. या हल्ल्यातील शहिदांना आळंदीत अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.