ChikhaliCrime

अंढेरा-मेरादरम्यान दुचाकीला अपघात, युवक जागीच ठार

चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली मार्गावरील अंढेरा ते मेरा दरम्यान अज्ञात युवकाचा आज रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, हा युवक जागीच ठार झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती.

या अपघातग्रस्त युवकाला अज्ञात वाहनाने उडविले असल्याचा संशय असून, वाहन पळून गेलेले आहे. त्याच्या दुचाकीचा क्रमांक एमएच २८ बीआर ८२७३ असा असून, तो देऊळगावराजा शहरातील शिंगणे नगर येथील रहिवासी असावा व त्याचे नाव बोरूडे किंवा बोबडे असावे, असे त्याच्या जवळील कागदपत्रांवरून दिसून येत आहे. या युवकाबद्दल काही माहिती असल्यास चिखली पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!