KhamgaonVidharbha

विवाहित प्रेमीयुगुलाची खामगावातील लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या

– महिलेला दोन मुलं-एक मुलगी, तर पुरुषालाही दोन मुले; मुला-बाळांना उघडे पाडून संपविली जीवनयात्रा

खामगाव (तालुका प्रतिनिधी) – विवाहित प्रेमीयुगुलाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खामगाव येथील कॉटन मार्वेâटसमोरील आदर्श लॉजमध्ये घडली. युवकाने व्हिडीओ कॉल करुन भावाला आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. आज पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेने खामगाव शहरात एकच खळबळ उडालेली आहे. बाळापूर तालुक्यातील कळंबी महागाव येथील विकास पंजाबराव सावळे (वय ३२) आणि सौ. शीतल तायडे (वय ३०) अशी या युगुलाची नावे आहेत. हे दोघेही विवाहित असून, त्यांचे बरेच वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.

काल, बुधवारी सायंकाळी हे दोघे पती-पत्नी असल्याचे सांगून, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील आदर्श लॉजध्ये रात्री मुक्कामासाठी थांबले होते. पहाटे उशिरापर्यंत या जोडप्याच्या काहीच हालचाली जाणवल्या नाहीत, म्हणून लॉज कर्मचार्‍यांना संशय आला. त्यामुळे दरवाजा ठोठावला असता, दरवाजादेखील उघडला गेला नाही. त्यामुळे लॉज चालकाने याबाबत पोलिसांना कळवले असता, या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. शहर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. आत्महत्या केलेले हे दोघेही प्रेमीयुगल विवाहित होते. सौ. शीतल नितोने – तायडे (वय ३०) रा. नांदुरा हिला दोन मुले व एक मुलगी असून, पती सुनील हे अपंग आहेत. शीतल ही मुंबई येथे पेशंट सांभाळण्याचे काम करायची तर तिचे माहेर खामगाव तालुक्यातील कंझारा आहे. तसेच मृतक विकास पंजाबराव सावळे (३२) रा. कळंबी. ता. बाळापूर यालादेखील दोन मुले आहेत. तो इंदूर येथे मशीन ऑपरेटरचे काम करीत होता. त्यामुळे तो तिथेच राहायचा अशी माहिती प्राप्त झाली आहे.


आत्महत्या करण्यापूर्वी विकासने त्याच्या भावाला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. विकासने व्हिडीओ कॉल करुन त्याच्या भावाला ‘शेवटचं घे पाहून’ असं सांगत आत्महत्या करत असल्याबाबत कळवले. त्यानंतर विकास सावळे व शीतल नितोने या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. विकासचा भाऊ लॉजवर आल्यानंतर लॉजच्या खोलीचा दरवाजा तोडून पाहिले असता ही घटना उघडकीस आली, असेही सांगण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!