चिखली (विशेष प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या शालेय हॉलीबॉल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल देऊळगाव घुबे येथील १७ वर्षे वयोगटातील मुलीच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा चांधई यांचा २/० सेटनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला.
या विजयाने हा संघ जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी तालुका प्रतिनिधी म्हणून पात्र ठरले. विजयी संघामध्ये ख़ुशी चौधरी, दिव्या काकडे, निकिता जाधव, पल्लवी घुबे, स्नेहल घुबे, विशाखा घुबे, श्रुती भुसारी, गौरी घुबे, या विद्यार्थिनींचा सहभाग होता. विजयी चमूचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे, संचालक प्रा.उद्धव घुबे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूस मुख्याध्यापक अमोल घुबे व प्रशिक्षक रामेश्वसर कराडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.