Aalandi

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : देशभरात विशेषता बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, प. बंगाल या भागात बिरसा मुंडा यांना क्रांतीसूर्य मानलं जातं. १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी बांधव साजरी करतात. आळंदी नेचर फाउंडेशन, आळंदी जनहित फाउंडेशन यांचे वतीने आळंदीत क्रांतीसुर्य बिरसा मुदा यांचे प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण तसेच पुष्पांजली वाहत जयंती दिनी अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आले. या प्रसंगी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, सामाजिक कार्यकर्त्या योगिता काटकर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, विधीतज्ञ निलेश वेताळ भाईचारा फाउंडेशनचे अध्यक्ष सुलतान शेख, भानुदास दाभाडे आदी उपस्थित होते.

यावेळी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा माहिती देत अभिवादन केले. बिरसा मुंडा यांचा जन्म मुंडा कुटुंबात १५ नोव्हेंबर १८७५ साली झाला. बालपणी ते सुंदर बासरी वाजवित असतं. छत्तीसगड राज्यातल्या आदिवासी भागात त्यांचे बालपण गेलं. वडिलांनी त्यांना मिशन स्कूलमध्ये पाठविलं. शिक्षण घेतलं पण, घरची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. इंग्रजांची नोकरी करावी, असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. पण, बिरसा यांनी शिक्षणाचा उपयोग आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठी केला. आदिवासींचं जीवन अभ्यासलं. जंगलात अनेक दिवस त्यांनी व्यतीत केले. यावेळी त्यांनी आदिवासींमध्ये जनजागृती केली. भारतीय संस्कृती, आयुर्वेद समजून घेतलं. औषधी विज्ञानात पारंगत झाले. रुग्णांची सेवा त्यांनी केली. घर स्वच्छ ठेवा. खोटं बोलू नका. एकजूट राहा. निर्णय पंचायत कडून करण्याचा संदेश त्यांनी आदिवासींना दिला. इंग्रजांनी आदिवासींना बेदखल केले. त्यांच्या जल, जंगल, जमिनीवर अधिकार गाजविले. तेव्हा बिरसा यांनी आदिवासींना संघटित केलं. अपनी धरती, अपना राज. जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजां विरुद्ध त्यांनी विद्रोह केला. संयोजन आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!