Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitics

डिसेंबरच्या थंडीत गावोगावीचे राजकारण तापणार!

– बुलढाणा जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
– थेट जनतेतून होणार सरपंच, आजपासून आचारसंहिता लागू

मुंबई/बुलढाणा (कैलास आंधळे/ प्राची कुलकर्णी) – ऐन गुलाबी थंडीत गावोगावीचे राजकारण तापणार आहे. राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार असून, आज (दि.९) राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान, १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणादेखील यानिमित्ताने झाली आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. १८ नोव्हेंबरला संबधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. ५ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. ७ डिसेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल. १८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होईल, तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांमुळे ऐन थंडीत ग्रामीण भागाचे राजकारण तापणार आहे.


निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल :

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.

मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.


राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.


– विविध जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या –

१. बुलढाणा : बुलढाणा १२, चिखली २८, देऊळगाव राजा १९, जळगाव जामोद १९, खामगाव १६, लोणार ३९, मलकापूर ११, मेहकर ५०, मोताळा ११, नांदुरा १३, संग्रामपूर २१, शेगाव १०, सिंदखेडराजा ३०.
२. अहमदनगर : अकोले ११, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २६, नगर २७, नेवासा, १३, पारनेर १६, पाथर्डी ११, राहाता १२, संगमनेगर ३७, शेवगाव १२, श्रीरामपूर ६, राहुरी ११, श्रीगोंदा १०.
३.अकोला : अकोला ५४, अकोट ३७, बाळापूर २६, बार्शी टाकळी ४७, मुर्तिझापूर ५१, पातूर २८, तेल्हारा २३.
४. अमरावती : अचलपूर २३, अमरावती १२, अंजनगाव सुर्जी १३, भातकुली ११, चांदुर बाझार २७, चांदूर रेल्वे स्टेशन १७, चिखलदरा २६, दर्यापूर २५, धामणगाव रेल्वे स्टेशन ७, धारणी २३, मोर्शी २४, नांदगाव खा. १७, तिवसा १२, वरुड २३.
५. औरंगाबाद : गंगापूर ३५, खुलताबाद १०, पैठण २२, फुलंब्री १८, सिल्लोड १८, वैजापूर २५, औरंगाबाद २५, कन्नड ५१, सोयगाव ५.
६. बीड : अंबाजोगाई ८३, आष्टी १०९, बीड १३२, धारुर ३१, गेवराई ७६, केज ६६, माजलगाव ४४, परळी ८०, पाटोदा ३४, शिरुर कासार २४, वाडवणी २५.
७. भंडारा : भंडारा ३९, लाखांदूर ५१, लाखाणी ५१, मोहाडी ५८, पाओनी ४६, साकोली ४१, तुमसर ७७.
८. चंद्रपूर : बल्लारपूर ५, भद्रावती ७,ब्रह्मपुरी १, चंद्रपूर ५, चिमूर ४, जिवती ३, कोरपणा १०, मुळ ७, नागभिड ५, पोंभुर्णा २, राजुरा ४, साओली ३, सिंदेवाही २, वरोरा १.
९. धुळे : धुळे ३३, शिरपूर १७, शिंदखेडा २३ ,साक्री ५५.
१०. गडचिरोली : अहेरी ३, अरमोरी २, चामोर्शी ४ ,देसाईगंज १, धानोरा ४, एटापल्ली १, कोर्ची १, गडचिरोली २, कुरखेडा २, सिरोंचा ७.
११. गोंदिया : आमगाव ३४, अर्जुनी मोरगाव ४०, देवरी २५, गोंदिया ७१, गोरेगाव ३०, सडक अर्जुनी ४३, सालेकसा ३१.
१२. हिंगोली : औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १०.
१३. जळगाव : अमळनेर २४, भडगाव ६, भुसावळ६, बोदवड ५, चाळीसगाव १६, चोपडा ५, धरणगाव ७, एरंडोल ६, जळगाव १२, जामनेर १२, मुक्ताईनगर २, पारोळा ९, रावेर २२, यावल ८.
१४. जालना : अंबड ४०, घनसावंगी ३४, जाप्रâाबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२, मंठा ३५.
१५. कोल्हापूर : आजरा ३६, भुदरगड ४४, चांदगड ४०, गडहिंग्लज ३४, गगनबावडा २१, हातकणंगले ३९, कागल २६, करवीर ५३, पन्हाळा ५०, राधानगरी ६६, शाहुवाडी ४९, शिरोळ १७.
१६. लातूर : अहमदपूर ४२, औसा ६०, चाकुर ४६, जळकोट १३, लातूर ४४, निलंगा ६८, शिरुर अनंतपाळ ११, उदगीर २६, देवणी ८, रेनापूर ३३.
१७. नागपूर : भिवपूर १०, कळमेश्वर २३, कम्पटे २७, काटोल २७, कुही ४, मोऊदा २४, नागपूर ग्रामीण १९, नरखेड २२, पारशिवणी २२, रामटेक ८, सावणेर ३६, उमरेड ७, हिंगणा ७, मौऊदा १.
१८. नंदूरबार : अक्कलकुवा ३१, अक्राणी ४७, नंदुरबार १८, नवापूर १६, शहादा १०, तळोदा १.
१९. उस्मानाबाद : भूम २, कळंब ३०, लोहारा १३, उस्मानाबाद ४५, परांडा १, तुळजापूर ४८, उमरगा २३, वाशी ४.
२०. पालघर : पालघर ३२, तलासरी १, वसई १५, वाडा १५.
२१. परभणी : गंगाखेड १३, जिंतूर ३३, मानवत ८, पालम ११,परभणी २९, पाथरी ७, पूर्णा १३, सेलू ११, सोनपेठ ३.
२२. पुणे : आंबेगाव २१, बारामती १३, भोर ५४, दौंड ८, हवेली ७, इंदापूर २६, जुन्नर २, खेड २३, मावळ ९, मुळशी ११, शिरुर ४, वेल्हा २८.
२३. रायगड : महाड ७३,श्रीवर्धन १३, अलिबाग ६, उरण १८, कर्जत ७, खालापूर १४, तळा १, पनवेल १०, पेण २६, पोलादपूर १६, माणगाव १९, मुरुड ५, म्हसळा १३, रोहा ५, सुधागड १४.
२४. रत्नागिरी : चिपळूण ३२, दापोली ३०, गुहागर २१, लांजा १९, मंडणगड १४, रत्नागिरी २९, संगमेश्वर ३६, खेड १०, राजापूर ३१.
२५. सांगली : आटपाडी २६, जत ८१, कडेगाव ४३, कवठे महाकाळ २९, खानापूर ४५, मिरज ३८, पलूस १६, शिराळा ६०, तासगाव २६, वाळवा ८८.
२६. सातारा : जावळी १५, कराड ४४, खंडाळा २, खटाव १५, कोरेगाव ५१, महाबळेश्वरर ६, माण ३०, पाटण ८६, फलटण २४, सातारा ३९, वाई ७.
२७. सिंधुदुर्ग: देवगड ३८, दोडामार्ग २८, कणकवली ५८, कुडाळ ५४, मालवण ५५, सावंतवाडी ५२, वैभववाडी १७, वेगुर्ला २३.
२८. सोलापूर : अक्कलकोट २०, बार्शी २२, करमाळा ३०, माढा ८, माळशिरस ३५, मंगळवेढा १८, मोहोळ १०, उत्तर सोलापूर १२, पंढरपूर ११,सांगोला ६, दक्षिण सोलापूर १७.
२९. ठाणे : भिवंडी १४, कल्याण ९, मुरबाड १४, शहापूर ५.
३०. वर्धा : आर्वी २६, आष्टी ६, देवळी १२, हिंगणघाट १२, कारंजा १७, समुद्रपूर ७, सेलू २३, वर्धा १०.
३१. वाशिम : कारंजा ५७, मालेगाव ४८, मंगरुळपिर ४४, मानोरा ४१, रिसोड ४५, वाशिम ५२.
३२. यवतमाळ : आर्णी ७, बाभुळगाव १, दारव्हा ८, दिग्रस ५, घाटंजी ६, मारेगाव९, नेर १, पुसद १२, राळेगाव , उमररखेड ४, वाणी १९, यवतमाळ १६, झारजिमणी ४.
३३. नांदेड : अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहारा २८, हदगाव ६, हिमायतनगर १.
३४. नाशिक : इगतपुरी २, कळवण १६, चांदवड ३५, त्र्यंबकेश्वर १, दिंडोरी ६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ १, बागलाण ४१, येवला ७, सिन्नर १२.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!