आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा हजारो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करून व्रत जोपासले. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, डॉ.नारायण महाराज जाधव यांचे हस्ते इंद्रायणीची आरती व पूजा करण्यात आली. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, माजी महापौर नितीन काळजे, जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्ण एस.भारद्वाज, राकेशकुमार महतो आदी उपस्थित होते.
छठ पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रद्धेने ३ दिवस अनेकांनी निर्जल उपवासासह केली. या पूजेत मावळत्या सूर्य देवाला व सकाळी उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य (नमन) करून करण्यात आली . यावेळी छठ वृत्तीचे स्वागत,दीप प्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम,संध्या अर्घ्य, कार्तिकी अन्नदान,प्रात: अर्घ्य, महाप्रसाद वितरण करण्यात आले. या पूजेतूनसर्व मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना आहे. या छठ पूजा महापर्वाचे आयोजन जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीरकुमार शर्मा, संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्णा एस.भारद्वाज, विनोदकुमार मिश्रा, राकेशकुमार महतो यांनी केले. यावेळी आळंदी व दिघी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. इंद्रायणी नदीघाटावर यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. छठ पूजा महापर्वाचे जगतगुरू शंकराचार्य समितीचे वतीने उत्साहात आयोजन करण्यात आले होते.