Breaking newsHead linesWorld update

मेलबर्नमध्ये ‘भारताची दिवाळी’, ‘पाकिस्तानचं दिवाळं’!

– टी-२० विश्वचषक स्पर्धा – अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला दिला रोमहर्षक विजय

मेलबर्न – टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने रोमहर्षक विजय साजरा करत, पाकिस्तानला धूळ चारली आहे. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या अतितटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सहा बळी राखून हरवले आहे. रवीचंद्रन अश्विन याने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला शानदार विजय मिळवून दिला, आणि मेलबर्नच्या मैदानावर भारतीयांनी दिवाळी साजरी केली. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरला. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. भारतातदेखील दिवाळीच्या जल्लोषात या विजयाची भर पडली, आणि एकच जल्लोष साजरा झाला. या सामन्यात टॉस हरलेल्या पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी करत, ८ बळी गमावून १५९ धावा केल्या होत्या. भारताकडून अर्शदीप सिंह व हार्दिक पांड्या यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन बळी घेतले. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाची तरुण फळी विश्वचषकात उतरली आहे. मागील विश्वचषकात पाकिस्तानसोबत झालेल्या पराभवाचा यावेळी वचपा काढत भारतीय संघाने आज पाकिस्तानचे अक्षरशः दिवाळे वाजवले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. भारताच्या 31 धावात 4 विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरूवात केली. त्याने नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. विराट कोहलीने नाबाब 82 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने समाधान व्यक्त केलं आहे.

भारत- रोहित शर्मा,  केएल राहुल, विराट कोहली,  सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल,  आर अश्विन,  मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान- मोहम्मद रिझवान, बाबर आझम, शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह,  हरिस रौफ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!