Breaking newsBuldanaChikhaliCrimeMaharashtraVidharbha

अल्पवयीन मुलीच्या छेडखानीवरून हाणामारी; जिवाच्या भीतीने तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

चिखली (तालुका प्रतिनिधी): – अल्पवयीन मुलीची छेडछाड का केली असे म्हणून मुलीच्या घरच्यांनी आरोपीच्या घरात घुसून हाणामारी केली आणि जिवे मारण्याच्या धाकाने तरुणाने गावाबाहेर जावून गळफास घेवून आत्महत्या केली. अशा एकमेकांच्या तक्रारी वरून १४ जनावर विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना शेलूद येथे १ ऑक्टोबर रोजी घडली .

चिखली तालुक्यातील शेलूद येथील एका अल्पवयीन मुलगी शौचालयास गेली असता तिला वाईट उद्देशाने धरून तिच्या गालाचे चुंबन घेतले अशा कारणावरुन मुलींच्या घरच्यांनी तरुणाच्या घरी जावून सर्वांचा झोडपले . या प्रकरणात आपली जाणीवपूर्वक बनमामी केल्या जात आहे म्हणून तरुण नामे चंदू गुलाबराव सुरडकर याने हाणामारीच्या तावडीतून पळ काढला आणि गावालगत जावून एका लिंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेवून आत्महत्या केली . अशा एकमेकांच्या विरोधात तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या . पहिल्या मुलीच्या आईच्या तक्रारी वरून ठाणेदार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार हिवाळे यांनी मृतक चंदू गुलाबराव सुरडकर यांच्या विरोधात कलम ३५४ ,३२३, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. आणि दुसऱ्या सौ रुख्मिना गुलाबराव सुरडकर यांच्या तक्रारी वरून १० आरोपी विरुध्द कलम ३२३, १४३, १४६, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६ भा.द.वी नुसार गुन्हे दाखल केले आणि आरोपी चंदू गुलाबराव सुरडकर याने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याने मृतकाची बहिण कु. उमा गुलाबराव सुरडकर वय २३ वर्ष हिच्या तक्रारी वरून आरोपी- दादाराव काळुबा साळवे , गजानन काळुबा साळवे , नागेश यशवंत साळवे , शरद भास्कर साळवे , संजू सुखदेव साळवे , संपत गजानन काकफळे , गौरव दादाराव साळवे ,शुभम दादाराव साळवे , मंगला दिलीप साळवे , दुर्गा शरद साळवे , संगीता नाडे , मनीषा अंकुश निकाळजे , अंकुश दिलीप निकाळजे सर्व रा शेलुद ता चिखली यांच्या विरोधात कलम ३०६ , ३४ गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास ठाणेदार लांडे यांनी स्वीकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!