Breaking newsHead linesMaharashtra

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर!

– राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या ७ हजार ३७५ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज येणार असून, ग्रामपंचायत निवडणुका किमान तीन महिने लांबणीवर पडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात आदेश काढले आहेत, तसेच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. या मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे ७ हजार ६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यातील या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे ७६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७ हजार ६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे सुमारे ७ हजार ६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणेकरीता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जश्या संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!