AalandiHead linesMaharashtraPachhim MaharashtraWomen's World

सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास जल्लोषात प्रारंभ

ढोल ताशाच्या गजरात सवाद्य श्रींची मिरवणूक

सप्तशृंगीगड वणी ( अर्जुन मेदनकर ) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगगड निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव अतिशय आनंदात, भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. प्रारंभ दिनी सोमवारी ( दि.२६) पहाटे विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात अलंकारांचे पूजन अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते करीत ढोल ताशाच्या गजरात सवाद्य श्रींची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था, सेवा सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेस कार्यरत झाले. नवरात्र यत्सव यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. घटस्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. या वेळी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, पालकमंत्री दादासाहेब भुसे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, विश्वस्त मनज्योत पाटील, विश्वस्त प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर, नितिन आरोटे (राजशिष्टाचार अधिकारी, नाशिक) व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख उपस्थित होते.

या वेळी ६० हजार भाविकांनी घेतले. भगवतीचे दर्शन व मोठ्या संख्येने उपस्थित भाविकां पैकी ९ ते १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा उत्सव दरम्यान २ वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरु असून येणार्‍या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. सप्तशृंगगड परिसरात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये त्या दृष्टीने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय २५६ कॅमेरे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून, १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे १० व ३ बंदूकधारी सुरक्षारक्षक व महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दल, कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत. ऐन वेळेस उदभवणार्‍या आपत्तीसाठी २४ तास अग्निशमन बंब सुविधा, प्रथोमपचार केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आलेले आहे. न्यासाच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था असून न्यासाच्या परिसरात सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आणि न्यासाचे एकूण ५ जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठ्यासाठी तैनात ठेवण्यात येणार आहे. संस्थान मार्फत संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० कर्मचारी नेमणूक करण्यात आली असून, उत्सव प्रसंगी भाविकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत टोल प्रâी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. ३ डोअर प्रâेम मेटल डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टरद्वारे मंदिरात भाविकांना दर्शनास चेक करून आत सोडण्यात येत आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर तसेच ८ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पूर्णतः खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांसाठी महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा मार्फत प्रवाशांना नांदुरी येथून ने – आण करण्याची सोया करण्यात आली आहे. सप्तशृंगगडा पासून एक किलो मीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.

या नवरात्रोत्सवात यात्रा यशस्वीतेसाठी न्यासाची विश्वस्त व्यवस्था व व्यवस्थापन आदींसह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग परिश्रम घेत असल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!