MaharashtraPoliticsVidharbha

छाटले जरी पंख माझे, लढेन नव्या उमेदीने’, सदाभाऊंच्या वेदनेला भटांच्या गझलेचा आधार!

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदाभाऊंनी भाजपच्या नेतृत्वाच्या आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यांच्या माघारीनंतर पुढील राजकीय वाटचालीविषयी उलट सुलट चर्चा होत आहेत, अशातच सदाभाऊंनी आपल्या वेदनेला गझलेचा आधार घेत, छाटले जरी पंख माझे, लढेन नव्या उमेदीने… असा निर्धार व्यक्त केला असून, कदाचित महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या वारंवार नवरे बदलणाऱ्या संघटनेच्या दबावाला बळी पडून भाजपने सदभाऊंचा उमेदवारी अर्ज मागे घेतला तर नसावा, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचे रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष खेळीमुळे राज्यसभेत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले, आवश्यक संख्याबळ नसतांना देखील फडणवीसांनी चमत्कार घडवला. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही फडणवीस असाच चमत्कार घडवतील व शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी विधान परिषदेत पाठवतीलच अशी चर्चा सर्वत होऊ लागली होती. ठरल्याप्रमाणे भाजपने अधिकृत पाच आणि सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप पुरस्कृत सहावा उमेदवार रिंगणात उतरवला देखील होता; पण शेवटच्या तीन दिवसांत अश्या काय घडामोडी झाल्या अन् अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदाभाऊंनी भाजपच्या नेतृत्वाच्या आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या माघारीनंतर पुढील राजकीय वाटचालीविषयी उलट सुलट चर्चा होता आहेत. अशातच सदाभाऊंनी आपल्या वेदनेला गझलेचा आधार घेत छाटले जरी पंख माझे,  लढेन नव्या उमेदीने… असा निर्धार व्यक्त केलाय.
२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे ५ तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. तत्पूर्वी अर्ज माघारीच्या दिवशी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. सदाभाऊंनी अर्ज मागे घेतला, त्याक्षणापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील वाटचालीविषयी चर्चा होतीये.

विधान परिषदेचा अर्ज मागे घेतल्यानंतर सदाभाऊंनी फार विचार न करता मुंबई सोडली. ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. दोन दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील कोंढार पट्ट्यात अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी, डाळींब, आंबा, मका व इतर फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  तिथला शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे.  त्याची पाहणी करण्यासाठी आ. सदाभाऊ खोत यांनी रात्रीच्या अंधारात नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.

तलवार म्यान, विधानपरिषदेचा अर्ज शेवटच्या मिनिटाला मागे

तत्पूर्वी त्यांनी आज ट्विटरवरुन गझलकार सुरेश भट यांच्या गझलेचा आधार घेऊन आपल्या राजकीय वाटचालीची दिशा त्यांनी स्पष्ट केली.

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही…

पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही…

छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी,

अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही…

असं म्हणत पुन्हा गरुडभरारी घेण्याचा आशावाद सदाभाऊंनी व्यक्त केला असून येत्या 22 जून ला सदाभाऊ खोत मुंबई येथे रयत क्रांती संघटनेच्या मोजक्याच पदाधिकार्यासोबत दोन दिवस महत्वपूर्ण बैठका घेऊन पुढील रणनीती ठरवणार असल्याचे रयत क्रांती संगटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!