– बुलढाणा जिल्ह्यातील १९ खून प्रकरणातील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करणार – वैभव गिते
अंत्री कोळी, ता. चिखली (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यात २०१२ ते २०२२ या कालावधीत अंदाजे १९ दलित बांधवांचे जातीय द्वेषातून खून झाले आहेत. या बांधवांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे. विविध शासन निर्णय व पुरावे पाहाता, जिल्हाधिकारी यांनी या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी तातडीने पाऊले उचलावीत, यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिसच्यावतीने राज्य सचिव वैभव गिते यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. तसेच, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणे आपणही शासन निर्णयांची अमलबजावणी करावी, अशी मागणी केली. त्याला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, गिते यांचे संघटनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले होते.
चिखली शासकीय विश्रामगृह येथे एडीएमजेचे प्रदेश सचिव वैभव गीते व प्रदेश सहसचिव पी. एस.खंदारे, पत्रकार व संपादक राहुल सावंत, भटक्या विमुक्त समाजाचे नेते महेश शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दलित समाजाचे बहुसंख्य सामाजिक नेते, कार्यकर्त्यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रा. डॉ. सुभाष राऊत अध्यक्ष सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती चिखली, प्रा. विजय वाकोडे, विजय नकवाल नगरसेवक, गोकुल शिंगणे नगरसेवक , हि.रा. गवई, भाई विजयकांत गवई जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना बुलडाणा, भाई विजय गवई जिल्हा अध्यक्ष दलित मुक्ती सेना बुलडाणा, प्रताप मोरे जेष्ठ पत्रकार, सलीम भाई जिल्हा उपाध्यक्ष, ब्रम्हा साळवे जिल्हा उपाध्यक्ष, बाळू भिसे बहुजन वंचित आघाडी शहर अध्यक्ष, पत्रकार व संपादक भाई छोटु कांबळे, प्रविण कांबळे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पत्रकार व संपादक योगेश शर्मा, अॅड. रुचिता जाधव विभागीय विधी सल्लागार, सौ. आशाताई कस्तुरे जिल्हा समन्वयक एनडीएमजे, कल्पनाताई केजकर, सौ. प्रतीभा गवई तालुका एनडीएमजे, स्वाती निकाळजे, सुभाष मोरे पीडित, संजय कदम, नितीन सरदार पीडित, दशरथ गायकवाड, भारत गवई विदर्भ विभागीय अध्यक्ष, प्रशांत झीने विदर्भ संघटक, प्रशांतभैया डोंगरदिवे जिल्हा अध्यक्ष, प्रेमानंद सरकटे जिल्हा सचिव, संकेत जाधव चिखली शहर अध्यक्ष, अॅड. के बी हिवाळे यांच्यासह नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीजचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
————————-