चिखली (तालुका प्रतिनिधी) – शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षणमहर्षी शेणफडराव घुबे यांच्यासह सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब घावटे व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना मातोश्री हरणाबाई जाधव स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये होणार्या झेप साहित्य संमेलनात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.
साहित्य, वृत्तपत्र, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना देण्यात येणारे अत्यंत प्रतिष्ठेचे मातोश्री हरणाबाई जाधव राज्य पातळीवरील सन २०२१ चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून, सल्लागार संपादक प्रा.डॉ.ऋषीकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारी संपादक प्रा.शिवाजी वाठोरे, निवासी संपादक सुरेश घोंगडे, विधी संपादक संतोष झाल्टे, कवि विधीज्ञ धीरज कुमार कस्तुरे, पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा श्रीमती एस. बी. साळवे, लेखिका छाया बैसाने, लेखक प्रा.सिद्धार्थ बनसोडे, कथाकार बबन महामुने, कवयित्री डॉ.सायली राऊत, कवयित्री विधीज्ञ मृणालिनी पांढवे, लेखिका प्रा.अलका डोंगरे, गायिका डॉ.रेश्मा गरड, लेखिका अश्विनी मनवर या समिीने मातोश्री हरणाबाई जाधव पुरस्कारार्थींची निवड केली आहे.
यामध्ये शेणफडराव घुबे बुलढाणा (शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य), डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर (लॉकडाऊन कादंबरी), रमेश बोर्डेकर उस्मानाबाद (दडपलेल जीर्ण: कथासंग्रह), भरत राजाराम काळे ठाणे (मै जीन्दंगी का साथ निभाता चला गया: आत्मकथन), डॉ.हबीब भंडारे औरंगाबाद (जगण विकणार्या माणसाच्या कविता : कविता संग्रह), डॉ.राजेश विश्वनाथ गायकवाड अहमदनगर (बाप नावाची माय: जीवनचरित्र), आबासाहेब घावटे सोलापूर (आनंदी आनंद गडे :बाल कथासंग्रह), सचिन बिराजदार, औरंगाबाद (दैनिक दिव्य मराठी) आदींना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण माहे डिसेंबर २०२२ मध्ये होणार्या झेप साहित्य संमेलनात मान्यवरांच्याहस्ते होणार असल्याची माहिती संपादक डी. एन. जाधव यांनी दिली आहे.