– जिल्हा युवा सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला ठणकावले!
चिखली /अंत्री काेळी (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखली तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, डांबरीकरणच निकृष्टदर्जाचे करण्यात येवून पैसे खाण्यात आले आहे. तालुक्यात रस्त्यांवर ठीकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तेव्हा, या रस्त्यांची कामे तातडीने सुरु करण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करण्यात येईल व त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची राहील, असा खणखणीत इशारा जिल्हा युवा सेनेने दिला आहे. तसेच, बोगस डांबरीकरणाच्या कामाची तातडीने चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारे व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणार्या अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. तर काही रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्यावरील डांबर उघडून रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तरी अशा कामांची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा युवासेनेचे जिल्हा प्रमुख नंदुभाऊ कर्हाडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच सदर निवेदनात या निवेदनाची दखल १५ दिवसाच्याआत न घेतल्यास युवासेनेच्यावतीने रास्ता रोकोसारखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुध्दा या निवेदनात देण्यात आला आहे.
चिखली हे तालुक्यातील चिखली ते जाफराबाद, चिखली ते धाड, पेठ ते एकलारा, आन्वी ते पेठ, इसरुळ ते देऊळगावघुबे, येवता ते मेन रोड यासारखे अनेक रस्ते खराब झालेले असून, त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. तरी सदर रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, तसेच चिखली ते जाफराबाद रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरणाचे काम झालेले असल्याने या रस्त्यावरील डांबर उघडलल्यामुळे खड्डे पडलेले आहे. तरी या कामाची चौकशीसुध्दा करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका प्रमुख कपील खेडेकर, जिल्हा युवासेना प्रमुख नंदु कर्हाडे यांच्यासह प्रीतम गैची, श्याम शिंगणे, दत्ता सुसर, आनंद गैची, संतोश भुतेकर, नंदु पाटील, प्रवीण सरदड, शिवा जाधव, ज्ञानेश्वर उंबरकर, रवी जवंजाळ, किरण दानवे, विजय सोरमारे, गणेश वाघमारे, निवृत्ती चव्हाण, विशाल कार्ले, अशोक सुरडकर, तानाजी चिकणे, सुनिल रगड, शंभु गाडेकर, अनिल जावरे, पवन चिंंचोले, शैलेश डोणगांवकर, हरि इंगळे, पंकज हाडे, राजु म्हस्के, इम्रान शेख, शेख रईस, शेख बबलु, ज्ञानेश्वर गायकवाड, गणेश कुडके, अक्षय माळोदे, ऋषी शेळके, सागर शेळके, किशोर महाले, नितीन सुरुशे, गजानन कुटे, मंगेश मोळवंडे, सोहेल शेख, विजय बावणे, प्रकाश शेळके, भागवत देवकर, आशिष निकम, अजय पवार, सुमित पवार, मोहन इंगळे, जीवन चिंचोले, पवन चिंचोले, मनु भूसारी, सागर मावळे, योगेश भूसारी, शुभम चिंचोले आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.