आळंदी ( अर्जुन मेदनकर) : येथील सार्वजनिक गणेशोत्सवात दोन वर्षांचे खंडानंतर साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात लक्षवेधी देखाव्यांची परंपरा कायम ठेवत येथील गणेश मंडळांनी समाज प्रबोधन पार तसेच धार्मिक,पौराणिक देखावे सादर परिश्रम पूर्वक सादर केले. गणेशोत्सवात भक्तिमय उत्साहात विविध सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम राबवित गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.
येथी वडगाव रस्त्यावरी जय भवानी तरुण मंडळाने पौराणिक लक्षवेधी देखावा साधार केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर टिंगरे यांनी दिली. गणेशोत्सवात मंडळाचे उपाध्यक्ष राज कडदेकर, कार्याध्यक्ष माऊली कदम, खजिनदार सुजित पडवळ आदींनी परिश्रम घेत देखावा तयार करून वेगळेपण जपले. येथील माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे यांचे मार्गदर्शनात न्यू दत्त मित्र मंडळाने केदारनाथ मंदिर लक्षवेधी भव्य देखावा आळंदीकरांचे आकर्षण ठरला. भव्य मंदिराची प्रतिकृती पाहण्यास भाविक, नागरिकांनी येथे गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले. नवशिवशक्ती मित्र मंडळाने हजेरी मारुती मंदिरात कीर्तन महोत्सव आयोजित करून हजेरी मारुती मंदिराचे वेगळेपण जोपासले. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळाचे प्रमुख माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचे मार्गदर्शनात केले आहे.
माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांचे मार्गदर्शनात हरहर महादेव मित्र मंडळाने श्री विठ्ठल मूर्ती सादर करून गणेशोत्सवात श्री पांडुरंगराय भाविकांचे लक्ष वेधून घेतले. येथील व्यापारी तरुण मंडळाने यावर्षी साधे पणाने गणेशोत्सव साजरा करून गणेशोत्सवात १०१ गणेश मूर्तीचे भाविकांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी पूजा साहित्य तसेच हळद, कुंकू, पेठे, आरती संग्रहाचे वाटप करण्यात आल्याचे अमित कुऱ्हाडे यांनी सांगितले. यासाठी मंडळाचे अध्यक्ष योगेश दिघे, विलास कुऱ्हाडे, माऊली गुळुंजकर, अमित कुऱ्हाडे, अक्षय कुऱ्हाडे, राहुल भोर, संतोष बोरुंदीया, गणेश कुऱ्हाडे, शंतनू पोफळे, सौरभ दिघे यांचे वतीने वाटपास विशेष सहकार्य करण्यात आले. येथील अखिल भाजी मंडई मंडळाने परंपरांचे पालन करीत श्रींचे मंदिरात गणेशोत्सव धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा केल्याचे मंडळाचे प्रमुख सुदीप गरुड यांनी सांगितले. येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे हस्ते विविध मंडळांसह श्रींचे आरतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ज्ञानराज मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, अमरदीप मित्र मंडळ,न्यू अमरज्योत मित्र मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, बाबाशेठ मुंगसे प्रतिष्ठान आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा केला. श्री दत्तनगर प्रतिष्ठानचे वतीने विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम तसेच संदीप जाधव यांचा स्वर कैवल्य हा भजन संध्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे उमेश कुऱ्हाडे, महेश कुऱ्हाडे यांनी सांगितले. विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यास मोठा प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख बक्षिसे, पारितोषिके, भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.