आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल आणि आळंदी जनहित फाउंडेशन यांच्या वतीने महिला शिक्षिकांसाठी शिक्षक दिनाचे निमित्त मोफत आरोग्य शिबीर उत्साहात आयोजित करण्यात आले. आळंदीतील विविध शाळांच्या महिला शिक्षिकांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात १२६ महिला शिक्षिकांची आरोग्य तपासणी आणि १३६ महिला शिक्षकांची एच. बी. तपासणी करण्यात आली. आळंदी पंचक्रोशीतील शाळांतील महिला शिक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याने शिबीर यशस्वी झाले.
या शिबिराचे उदघाटन श्रींची प्रतिमा, धन्वंतरी मूर्तीचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय सेल माजी अध्यक्ष डॉ. मनोज राका, एमसीआयएम महा.राज्य माजी सदस्य डॉ. सुनील आवारी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार दीपक पाटील, मल्टिटेक कॉम्पुटर्सचे संचालक प्रा. सचिन थोरवे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, ज्ञानराजा इंग्लिश स्कुलचे राजाभाऊ रंधवे चोपदार, माजी नगरसेविका मालती कुऱ्हाडे, शेतकरी बचाव आंदोलन अध्यक्ष गजानन गाडेकर, शिबिराचे संयोजक डॉ. ज्योत्सना आवारी, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक मुंगसे, लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल अध्यक्षा वंदना खंबाटे, पूर्वा राव,साक्षी आपटे, अक्षता टिळक, डॉ. सपना गांधी, स्नेहल पटवर्धन, ज्ञानसाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका अंजली उपाध्ये, प्राचार्या उर्मिला जाधव, मोहिनी बदाणे, संघर्ष युवा प्रतिष्ठान अध्यक्ष नामदेव भोसले, सामाजिक कार्यकर्ते नारायण घोलप, पंकज शिंदे, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, पोलीस वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव, शिवा संघट्नेचे अध्यक्ष सदाशिव साखरे, हेमंत मुंनफड, अनिल जोगदंड, विठ्ठल शिंदे, दादासाहेब कारंडे, शैलेश सावतडकर आदी मान्यवर उपिस्थत होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल, आवारी हॉस्पिटल संचालिका डॉ. ज्योत्सना आवारी यांच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजक करण्यात आलेल्या आरोग्य विषयक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन करीत वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे ओळखून शिक्षक दिना निमित्त सर्व शिक्षिकांना तुळशीरोपे भेट देत सर्व शिक्षिकांना शाल,श्रीफळ गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महिलांच्या आरोग्याची काळजी घेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे स्वागत करीत असे उपक्रम इतर संस्थाना प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले. पोलीस वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आवारी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. ज्योत्सना आवारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेस परिश्रम घेतले. या शिबिरात १२६ महिला शिक्षिकांची आरोग्य तपासणी आणि १३६ महिला शिक्षकांची एच. बी. तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल प्रकल्प प्रमुख डॉ. ज्योत्सना आवारी यांनी केले. सूत्रसंचालन भागवत काटकर यांनी केले. आभार सदाशिव साखरे यांनी मानले. पसायदानाने शिबिराचे उदघाटन समारंभाची सांगता झाली.