-शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे शिक्षक दिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन
मुक्ताईनगर (अर्जुन मेदनकर) : पारंबी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील नवीन माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शिक्षकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील इयत्ता आठवी ते दहावीमधील प्रत्येकी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा एकूण सहा गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.