मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) – कोरोनाच्या महामारी आजारामुळे गावा गावात गणेशोत्सव सोहळा साजरा केला गेला नाही, त्यामुळे आता दोन वर्षांचा कार्यकाळ भरून काढण्यासाठी गणेश मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठी तयारी चालविली आहे. परंतू यासाठी गणेश मंडळांनी गणपती विसर्जन सोहळा शांततेत व आनंदात पार पडण्यासाठी मिरवणूकीत गुलाल ऐवजी फुलांचा वर्षांव करावा जेणे करुन एकमेकांत वाद होणार नाही, अथवा शरीराची कोणत्याही प्रकारची हाणी होणार नाही, असे तहसीलदार अजित कुमार येळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा ठाणेदार गणेश हिवरकर यांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन ८ सप्टेंबर रोजी धोत्रा नंदई फाट्यावरील भगवान मुंडे यांच्या मंगल कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी मंचकावर अध्यक्ष म्हणुन तहसिलदार डॉ अजित कुमार येळे हे उपस्थीत पाहून रेती माफियांची चांगलीच घबराट झाल्याचे दिसून आली . जोपर्यत तहसीलदार यांची गाडी जात नव्हती तोपर्यत रेती वाहन चालक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. प्रमुख अतिथी म्हणून दे राजा येथील नायब तहसिलदार प्रिती जाधव , ठाणेदार गणेश हिवरकर, भगवान मुंडे, प्राचार्य दिलीप सानप, दुय्यम ठाणेदार वासांडे , आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये चिखली तहसिलदार यांनी सांगितले की गणेशाेत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी न्यायालय, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी , यांच्यां आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे , मिरवणूकीत लावलेल्या वाहनाची संबंधित विभागाकडून तपासणी करून घ्यावी . डीजे वाजविण्यास कडक बंदी घातली आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील अशी गाणे वाजू नये , लहान मुलांना घटनास्थळी घेवुन जावू नये. त्याच प्रमाणे मिरवणूकीत गुलाल उधळन्या ऐवजी फुलांचा वर्षांव करावा जेणे करून कोण्याच्या डोळ्यात , अंगावर , केसांमध्ये कपड्यावर फेकू नये ,दारूच्या नशेत मिरवणूकीत जावू नये , महिला, तरुण मुलींचा आदर करावा , यासाठी पोलिस कर्मचारी मिरवणुकीला उपस्थीत असलेतरी गणेश मंडळांच्या स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला संरक्षण द्यावे जर एखाद्या व्यक्तीने वाहनांच्या समाेर उभे राहून गुलालाची उधळण करून हुल्लडबाजी करणाऱ्या मंडळांची नोंद घेतली जाईल. संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बाेलवून त्यांना याेग्य समज दिली जाईल. गरज भासली तर गुन्हेही दाखल करण्यात येतील आणि भविष्यात गाेंधळ घालणाऱ्यांना परवानगी देताना पाेलिस प्रशासनातर्फे विचार करू. त्यामुळे काही अडचण आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे अशा अनेक विषयाच्या अनुषंगाने त्यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी ठाणेदार गणेश हिवरकर , दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, एसआय मोरर्शिंग राठोड, अच्युतराव शिरसाट, गजानन वाघ, पोहेकॉ कैलास उगले, काकड, दराडे, सोनकांबळे, समाधान झिने, भरत पोफळे, गवई, वानखेडे, खार्डे , जाधव, तथा हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार , जिलानी सेठ, आदी जण उपस्थित होते.