लंडन – ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य करणार्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे आज निधन झाले. त्या एपिसोडिक मोबिलिटी या आजाराने ग्रस्त होत्या. डॉक्टरांनी महाराणीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, वैद्यकीय उपचारांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणीने अखेरचा श्वास घेतला.
महाराणी एलिझाबेथ यांची तब्येत नाजूक असल्याचे याआधीच बकिंघम पॅलेसकडून सांगण्यात आलेले होते. तब्येतीच्या कारणामुळे महाराणी एलिझाबेथ यांनी आपली प्रिव्ही काउन्सिलची बैठकही रद्द केली होती. गेल्याच वर्षी त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलिप यांचे निधन झाले होते. शाही राजघराण्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. आज दुपारी बालमोरलमध्ये त्यांचे निधन झाले, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर शाही परिवार लंडनमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली होती. नुकत्याच इंग्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या निवडणूक पार पडल्या. यावेळी स्वतः महाराणी एलिझाबेथ यांनी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या लीज ट्रस्ट यांची पंतप्रधान म्हणून औपचारिक घोषणा केली होती. स्वतः नवनियुक्त पंतप्रधान या महाराणी एलिझाबेथ यांच्या यांची विचारपूस करण्यासाठी स्कॉटलंडमधील बाल्मोर कॅसलमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांच्यानंतर महाराणींना भेटण्यासाठी राजपुत्र विल्यम आणि युवराज्ञी चार्ल्स हे दाखल झाले होते. संपूर्ण यावेळी देशभरातून राणी एलिझाबेथ यांच्या आरोग्यसाठी प्रार्थनादेखील करण्यात येत होत्या.
२१ एप्रिल १९२६ झाली लंडनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म झाला. २० नोव्हेंबर १९४७ रोजी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा शाही विवाह झाला. १९४५ साली त्या ब्रिटीश सैन्यात महिला विभागात दाखल झाल्या होत्या. १४ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स चार्ल्स याचा जन्म झाला. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी वडील किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या महाराणी झाल्या. २ जून १९५३ रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना महाराणीचा मुकुट घालण्यात आला. २१ जून १९८२ रजी त्यांचा नातू प्रिन्स विलियम याचा जन्म झाला. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी ६०वर्षे पूर्ण केली म्हणून हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. ९ सप्टेंबर २०१५ साली इंग्लंडवर सर्वाधिक काळ राज्य करणार्या त्या पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या. एप्रिल २०२० मध्ये देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ९ एप्रिल २०२० रोजी त्यांचे पती पिन्स विल्यम्स यांचा मृत्यू झाला.
https://twitter.com/i/broadcasts/1PlJQpRRNgWGE