नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंत सणासुदीच्या काळात मिठाई व फरसाणची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. दरम्यान जास्त पैसे कमविण्यासाठी अनेक दुकान मालक नागरिकांच्या आरोग्याला नुकसान होईल असे नित्कृष्ठ दर्जाचे पदार्थ बनवून विक्री करतात अश्या व्यापाऱ्यांवर नंदुरबार अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरू आहे.
नंदुरबार शहरातील बिकानेर स्वीट मार्ट, हॉटेल राजस्थान या ठिकाणाहून अन्नाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे. तर या अन्नाचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तर शहादा शहरात अन्न औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहे. विना परवाना व्यवसाय करणाऱ्या मे फ्रायो फुड्स या पेढीला भेट देऊन अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. यावेळीअन्न व औषध प्रशासन विभागाने २ लाख २४ हजार रुपये किमतीचे नमकीन व शेवसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी पवार, सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या पथकाने केली आहे.