मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) – शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या माहेरच्या गावातील जिल्हा परिषद शिक्षकांचा गुणगौरव करीत सत्कार केला.
मेरा बु येथील रहिवासी असलेल्या चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी शिक्षण दिनानिमत्ताने ग्रामीण भागातील शिक्षकांचा सत्कार पंचायत समिती सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रम प्रसंगी गटविकास अधिकारी सावळे, गटशिक्षण अधिकारी आर. डी. शिंदे , विस्तार अधिकारी सावके, फुलझाडे, कृषि अधिकारी सोनूने, अभियंता जायभाये, बोर्डे, राठोड, आदी जण उपस्थित होते.
यावेळी आमदार सौ महाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले की, माझे माहेर मेरा बु. आहे. या गावामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने गावात जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहे , आणि एक शिवाजी हायस्कूल आहे. मात्र विद्यार्थांना प्राथमिक शिक्षण देण्याचे काम जि. प. शिक्षकाकडून केल्या जात आहे. मला आमदार , आणि गावातील इतर काही नातेवाईकांनी अनेक पदे भूषविली आहेत. या पाठीमागे जि. प. शाळेचे मोठे योगदान आहे. गेल्या अनेक वर्षापासून जि. प.शाळेचे मुख्याध्यापक एम. डी. पडघान आणि शिक्षक संजय फदाट यांनी मोठी मेहनत घेवून शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात पाठवून राज्यस्तर, जिल्हा स्तर, आणि तालुकास्तरावर येथे प्रथम , द्वितीय, असे बक्षीस घेतले आहे. त्यामुळे माहेरचे अनेक मुले मुली चांगल्या प्रकारे नोकर्या करीत आहेत तर काही उच्चशिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी घडविणार्या जि. प. शिक्षकांचा कुठेतरी न्याय मिळाला हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार सौ महाले यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिखली सभागृहात शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.
या सत्कार सभारंभ कार्यक्रमासाठी मेरा बु येथिल शिवाजी हायस्कूल वगळता फाट्यावरून जि. प.चे मुख्याध्यापक एम. डी. पडघान , आणि गावातील जि. प. शाळेचे शिक्षक संजय फदाट यांना आमंत्रित करूण त्यांचा शाल श्रीफळ देवून गुणगौरव करीत सत्कार केला. तसेच शिवाजी हयस्कूल मध्येही कार्यक्रम घेतला होता. मात्र कभी खुशी कभी गम हा प्रकार पाहायला मिळाला. यावेळी चिखली प.स.सभागृहांत तालुक्यातील मोठया संख्येने सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य, तथा महिला शिक्षीका शिक्षकवृंद व नागरीक उपस्थित होते.