ट्रान्सपोर्ट व्यवसायीकाकडून एक लाखाची लाच घेणारा पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
गडचिरोली (ब्रेकिंग महाराष्ट्र):- आलापली येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाकडून एक लाखाची लाच घेणारा पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला असून एसीबी पथकाने 05 सप्टेंबर रोजी लाचखोर पोलीस निरीक्षकास अटक केली आहे
.नागेपली ता.अहेरी जिल्हा.गडचिरोली येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार हे वाहन ट्रान्सपोर्टचे काम करतात. दरम्यान तक्रारदार याचेवर पो.स्टे. अहेरी जि.गडचिरोली येथे गुन्हा दाखल असून अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम गोविंदराव गव्हाने यांनी तक्रारदार याच्यावर दाखल असलेल्या गुन्हाचा तपासामध्ये मदत करण्याकरितां व तक्रारदार याचे वाहन ट्रान्सपोर्ट वाहतूक सुरळीत चालू देण्याचा कामाकरीता 1 लाखाची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून आज 5 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळनी व सापळा कार्यवाही दरम्यान श्याम गव्हाने पोलीस निरीक्षक अहेरी यानी तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करून पो.स्टे. अहेरीचा आवारात उभी असलेले शासकीय वाहनांमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यावरून श्याम गोविंदराव गव्हाने पो.निरीक्षक अहेरी याना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कार्यवाही सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही .राकेश ओल्ला पोलीस उपायुक्त/पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. नागपूर , मधुकर गिते अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर तसेच पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमंती.शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन कर्मचारी नापोकॉ नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे,पो.अ. रविकुमार ठेगडे, व चा.पो.अ.सतीश सिडाम,सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यानी यशस्वी पार पाडली.