शेतकरी आणि त्यांची पिकेही उद्ध्वस्त करणारे अज्ञात शत्रूंचा बंदाेबस्त करण्याची गरज
नंदूरबार (आफताब खान) – नंदूरबार जिल्ह्यात यावर्षीही अज्ञातांकडून पिके कापून फेकल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात गणेश पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात पपईची लागवड केली होती. मात्र अज्ञात माथेफिरुनी त्यांच्या बागेतील ४० ते ५० पपईच्या झाडांची कत्तल केली आहे. पपईचे झाडे कापून फेकल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, पोलीस प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन ग्रामीण भागात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, संबंधित शेतकर्याला नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे.