अंबाबरवा अभयारण्यात इको सायन्स पार्कमध्ये पर्यटकांची लूट तर कर्मचऱ्यांची दादागिरी वाढली
संग्रामपूर:(ब्रेकिंग महाराष्ट्र):- तालुक्यातील आदिवासी गाव वसाली येथे पर्यटकांसाठी अंबाबरवा अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे. येथील अधिकारी व कर्मचारी नियमबाह्य वसुली करून दादागिरीची भाषा पर्यटकासोबत वापरतात या गंभीर विषयाकडे वरिष्ठांनी जातीने लक्ष देऊन या मुजोर कर्मचाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी परिसरातील पर्यटक करीत आहेत. अंबाबरवा अभयारण्य असल्याने परिसरातील पर्यटकांची वसाली येथील इको सायन्स पार्क पाहण्यासाठी खूप गर्दी होते. तर या पार्क मध्ये प्रवेशासाठी १२ वर्षावरील व्यक्ती साठी २० रुपये तर लहान मुलांसाठी १० रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच चार चाकी, दुचाकी पार्किंग शुल्क वेगळे आकारण्यात आले आहे. परंतु गेटवरील कर्मचाऱ्यांनी ओळखीच्या लोकांना कोणतेही शुल्क आकारात नाही किंवा वाहने अडविली जात नाही. मात्र बाहेरील आलेले पर्यटक इको सायन्स पार्क मध्ये चारचाकी व दुचाकी वाहने आत घेऊन गेले तर हे कर्मचारी यांनी वाद घालून दादागिरीची भाषा वापरून पर्यटकांना वेठीस धरतात आणि प्रवेशासाठी नियमबाह्य शुल्क आकारतात . असा मुजोर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पर्यटक करीत आहेत.
मी व माझे कुटुंब २१ ऑगस्ट रोजी इको सायन्स पार्क पाहण्यासाठी गेलो असता गेटवरील कर्मचाऱ्यांनी विनाकारण जास्त शुल्क आकारले. यावेळी कर्मचाऱ्यांना पावती मागितली असता त्यांनी पावती न देता दादागिरीची भाषा वापरत होते व इको पार्क हॉटेल ग्रीन पार्क मध्ये सुद्धा अरेरावीची भाषा हॉटेल चालक वापरत होते. या सर्व प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज पाहून या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पर्यटक रवी सिरस्कार यांनी केली आहे.
21 ऑगस्ट रोजी गेटवरील कर्मचाऱ्यांनी काही पर्यटकांना त्रास दिला असे मला फोन आले. मी स्वतः त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती एस. बी. वाकोडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली