Breaking newsHead linesPolitics

BREAKING NEWS! महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस’; आता आम आदमी पक्षाचे आमदार ‘स्वीचऑफ’।

– तब्बल ४० आमदार फुटण्याची शक्यता!
– आमदारांना खरेदीसाठी भाजपकडून २० कोटींची ऑफर? – ‘आप’चा आरोप

नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राजधानी नवी दिल्लीत आता ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयोग सुरु झाल्याची शंका बळावली असून, महाराष्ट्रासारखीच दिल्लीची सत्ताही हाती घेण्याचा प्लॅन भाजपने रचला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. त्यातच आज सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीला १० आमदारांनी दांडी मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ तेथील अनुभवी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उधळून लावल्यानंतर, तोच प्रयोग महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत होत असल्याचा राजकीय संशय राजधानीत निर्माण झालेला आहे. आम आदमी पक्षाचे १० आमदार संपर्कात नसल्याची माहिती हाती आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी ११ वाजता आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, आमच्या काही आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची माहिती, एका नेत्याने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ अंतर्गत अशा स्थितीत आम आदमी पक्षाला भाजप आपले आमदार फोडेल की काय ?अशी शंका आहे. त्यामुळे काल संध्याकाळी आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आम आदमी पक्षाचे किती आमदार पोहोचतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दिल्लीत आम आदमी पक्षाचे एकूण ६२ आमदार आहेत. ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला ५२ आमदारांनी हजेरी लावली. परंतु, १० आमदारांचा फोन स्वीचऑफ लागत होता.

दिल्लीत दारू धोरण घोटाळ्यावरून संघर्ष सुरू आहे. दिल्लीत पक्षाचे आमदार विकत घेण्याच्या प्रयत्नात भाजप अपयशी ठरला आणि ऑपरेशन लोटस उघड झाल्याचा आम आदमी पक्षाचा दावा आहे. काल, आपचे काही आमदार पत्रकार परिषदेतून बाहेर आले आणि त्यांनी दावा केला की त्यांना भाजपकडून २०-२० कोटींची ऑफर देण्यात आली होती आणि इतर अनेक आकर्षक आश्वासनेही दिली होती. ‘आप’च्या दाव्यावर भाजपने म्हटले की, उत्पादन शुल्क धोरणाबाबतचे आरोप टाळण्यासाठी आम आदमी पक्ष अशा खोट्या गोष्टी पसरवत आहे.


७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत आपचे ६२ आमदार असून, यापैकी महाराष्ट्राप्रमाणेच ४० आमदार फुटणार असल्याची शक्यता आहे. तर भाजपचे ८ आमदार आहेत. सरकार बनवण्यासाठी ३६ आमदारांची गरज आहे. दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाले तर एखाद्या बंडखोराला किंवा भाजपला मुख्यमंत्रीपद मिळू शकते, असे राजकीय सूत्राचे म्हणणे आहे.


‘ऑपरेशन लोटस’ फेल गेल्याचा ‘आप’चा दावा!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावलेल्या आम आदमी पक्षाच्या बैठकीला ६२ पैकी ५२ आमदार हजर आहेत. आम्ही भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ उधळून लावले आहे, असा दावा ‘आप’कडून केला जात आहे. तथापि, सूत्राच्या माहितीनुसार, ‘आप’चे ४० आमदार संपर्काबाहेर होते. त्यांचे फोन स्वीचऑफ लागत होते. जे आमदार बैठकीला हजर आहेत, त्यांची नावे आम आदमी पक्षाकडून जाहीर केली जात नव्हती. भाजप २० कोटीमध्ये आमचा एक आमदार खरेदी करत आहे, ते ८०० कोटी घेऊन उभे आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते दिलीप पांडे यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!