BuldanaChikhali

शेकडो कामगारांच्या उरलेल्या जेवणाची विल्हेवाट लावलेले खड्डे ओव्हरफ्लो!

मेरा बु , ता. चिखली (प्रताप माेरे) :  तालुक्यातील कामगार मजूर लोकांना घरपोच जेवण पुरविण्याचा कारखाना ठेकेदाराच्या माध्यमातून चालविल्या जातो.  दररोज शिल्लक राहत असलेले शेकडो क्विंटल जेवण एका खड्ड्यात टाकले जात असून, खड्डे ओव्हरफ्लो झाल्याने त्याची दुर्गंधी दूरदूर पसरली आहे. या दुर्गंधीमुळे अनेकांची चागलीच डोकेदुखी बनली आहे.

शासनामार्फत ग्रामीण भागातील कामगार व गोरगरिबांना चागले व दर्जेदार मोफत जेवण मिळावे, यासाठी बेराळा फाट्यावर गेल्या काही महिन्यांपासून एका गोडावून मध्ये जेवण बनविल्या जात आहे. हे जेवण बनविण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील स्वयंपाकी आणले आहेत.  या कारखान्यामधून दररोज सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळात ५० ते ६० गाड्या गावागावात जावून कामगार व गोरगरिबांना जेवण पोहचवीतात.  दररोज गावात जेवण येत असल्याने गोरगरीब मजूर ताट घेवून रांगेत उभे राहतात.  मात्र एका वाहन चालकाकडे दोन पेक्षा जास्त गावे असल्याने काही वाहन चालक घाईघाईने जेवण पोहचून परत येतात, त्यामुळे काहींना जेवण मिळते तर काही लोकांना मिळत नाही.

शिल्लक राहिलेले जेवण वाहन चालक परत घेवून जात असल्याने शेकडो क्विंटल उरलेले जेवण एका खड्ड्यात टाकून जेवणाची विल्हेवाट लावतात.  हा खड्डा चिखली ते देऊळगावराजा रोडवर असलेल्या मलगी फाट्यावर हायवे रोडला लागून आहे .  दररोज खड्ड्यात विल्हेवाट लावलेल्या विविध खाद्यपदार्थामुळे खड्डे ओव्हरफ्लो होवून  मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी दुरदूरवर पसरली आहे . रोडवरून दररोज येजा करणारे वाहन चालक ,शेजारी असलेले शेतकरी वर्गांना फार त्रास सहन करावा लागत आहे .  ठेकेदाराने उरलेल्या अन्नपदार्थांची विल्हेवाट रोड शेजारी न करता एका खोल दरीत खड्डा खोदून करणे गरजेचे होती. मात्र हा खड्डा रोड शेजारी असल्याने लोकांना जगणे मुश्कील झाले आहे . तरी संबंधित अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी जनतेकडून केल्या जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!