धक्कादायक! खामगाव तालुक्यातील गोंधनापुरच्या मोहम्मद जुनेदचे पाकिस्तानशी धागेदोरे!
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गोंधनापुर येथील जुनेद मोहम्मद याला २४ मे रोजी दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील दापोडी भागातून अटक केली होती. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.जुनेद हा पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशत व प्रदेशातील भाजपचे महत्वाचे नेते संपविण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
खामगाव तालुक्यातील गोंधनापुरचा मोहम्मद जुनेद यास दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. पुढे तपास करीत असताना दहशतवाद विरोधी पथकास मोहम्मद जूनेदचे धागेदोरे पाकिस्तानशी असल्याचे आता समोर आले आहे. जुनेद हा पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशत माजविण्यासाठी कट रचत असून यासाठी मोहम्मद जूनेदला आवश्यक ती सर्व मदत व सामग्री पाकिस्तानातून मिळणार होती. तर उत्तर प्रदेशातील भाजपचे त्वाा नेते संपविण्याचा कट सुद्धा मोहम्मद जुनेद याने रचल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात उघड झाली आहे आहे.
भारतीय जनता पक्षाच्या रॅलीवर हल्ला करण्याचा सुद्धा जुनेदचा प्लॅन होता. नरसिंहानंद सरस्वती, संदीप आचार्य, जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी या तिघांना यमसदनी पाठविण्याच्या कट जुनेद रचत होता. विशेष म्हणजे मोहम्मद जुनेदच्या या सर्व कामासाठी आवश्यक असलेला पैसा आणि इतर साहित्य हे पाकिस्तानातून पुरवणार होते असेही समोर आले आहे. काश्मीरमधील दहशतवादी संघटनांसोबत जुनेदचा संपर्क होता. सोशल मीडियावर बनावट खाते ओपन करून तो दहशतवादी साथीदारांच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.