मेहकर – खामगाव आगाराचा भोंगळ कारभार; अनेक बसफेऱ्या बंद, तर विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास!
मेहकर ( गणेश पाटील ) – मेहकर व खामगाव आगाराच्या भोंगळ कारभारामुळे मेहकर -अकोला तसेच मानव विकास मिशनची मेहकर- नायगाव देशमुख, खामगाव आगाराची खामगाव – आलेगाव मार्गे पातुर आणि अकोला आगाराची देऊळगाव साकर्शा मार्गे जाणारी अकोला -औरंगाबाद, अशा बस फेऱ्या बंद असल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना ऑटो मधून जीवघेणा प्रवास करून देऊळगाव साकर्शा येथे शाळेमध्ये शिक्षणासाठी यावे लागते. तसेच इतरही बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांमधून जास्तीचे भाडे मोजून प्रवास करावा लागतो.
मेहकर – खामगाव आगाराच्या भोंगळ कारभारामुळे अनेक बसलेल्या बंद असून, त्यामध्ये मेहकर आगाराची मेहकर अकोला मार्गे देऊळगाव साकर्शा तसेच विद्यार्थिनीसाठी असलेले मानव विकास मिशनचे नायगाव देशमुख ही बस फेरी बंद असल्याने विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना ऑटो मधून जीवघेणा प्रवास करावा लागतो, व शिक्षणासाठी देऊळगाव साकर्शा येथे यावे लागते सदरच्या बसलेल्या यापूर्वी सुरू होत्या. परंतु मागील महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देऊळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्प तुडुंब भरल्याने आणि ओव्हर फ्लो झाल्याने देऊळगाव साखरशा येथून अकोल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतावळी नदीवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने, सदर बसलेल्या बंद केल्या होत्या. परंतु उतावळी नदीवरील नव्यानेच बांधकाम केलेला पूल वाहतुकीसाठी सुरू झाला असून, मेहकर व खामगाव घराच्या निष्काळजीपणामुळे अद्याप पर्यंत सदर बसलेल्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या नाही. सदर बस फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यासाठी सरपंच संदीप आल्हाट यांनी आगार व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग मेहकर यांचे पूल दुरुस्त झाल्याचे पत्र 23 ऑगस्ट रोजी खामगाव आगाराच्या आगार प्रमुख श्रीमती तांबटकर यांना देऊळगाव साकर्शा ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख व बाळू वानखडे यांनी दिले व तसेच पत्र मेहकर आगार प्रमुख यांना ग्रामविकास अधिकारी शेळके यांनी दिले व सदर बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली.
सदर बस फेऱ्याबंद असल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच प्रवासी यांचे अतोनात हाल होत असून, मेहेकर आगाराची मेहकर अकोला मार्गे देऊळगाव साकर्शा तसेच मानव विकास मिशनची विद्यार्थिनी साठी असलेले नायगाव देशमुख आणि खामगाव आगाराची देऊळगाव साकर्शाच्या आलेगाव मार्गे पातुर जाणारी तसेच अकोला आगाराची देऊळगाव साकर्शा मार्गे औरंगाबाद आधी बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थिनी विद्यार्थी व प्रवासी वर्गातून होत आहे.
मानव विकास मिशनची नायगाव देशमुख बस फेरी बंद असल्याने विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पोहोचण्यास उशीर होतो. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तरी लवकरात लवकर बस सुरू करण्यात यावी.
– अशोक खोरखेडे , मुख्याध्यापक तथा प्राचार्य सरस्वती विद्यालय देऊळगाव साकर्शा
उतावळी नदीवरील पूल दुरुस्त होऊन सुद्धा सदर बस फेऱ्या पूर्ववत सुरु न झाल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, प्रवाशांना जास्तीचे भाडे मोजून प्रवास करावा लागत आहे. तसेच वेळेवर वाहन मिळत नसल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे. तरी सदर बसेस पूर्ववत सुरू करण्यात याव्या.
-संदीप आल्हाट, सरपंच ग्रामपंचायत देऊळगाव साकर्शा