आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील च-होली बुद्रुकमधील इंस्पायर फाऊंडेशन संचलित अँपेक्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७६ व्या स्वातंत्र्य दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी महापौर नितिनअप्पा काळजे, माजी नगरसेविका विनयाताई तापकीर, सुवर्णाताई बुर्डे, सचिन तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय मुलांची कवायत, देश भक्तिपर गीत, देशाच्या विविधतेचे दर्शन घडवणारे तसेच पारतंत्र्यापासून स्वातंत्र्यापर्यंतचा प्रवास दाखविणारे पारंपारिक नृत्य प्रकार, लेझीम आदी सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीमय जल्लोषात सादर करण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
Leave a Reply