आळंदी ( अर्जुन मेदनकर : येथील स्वराज ग्रुप तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरास युवक तरुणांनी उत्स्फुर्द प्रतिसाद देत स्वातंत्र्य दिना निमित्त आयोजित शिबिरात २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील हे १५ वे रक्तदान शिबीर होते. स्वराज ग्रुपचे या निमित्त परिसरातून कौतुक होत आहे.
गेल्या १५ वर्षांपासून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. शहरातील रक्ताचा तुटवडा आणि गरजूंना रक्त मिळवून देण्यासाठी स्वराज ग्रुप रक्तदान शिबिराचे नियमित आयोजन करीत असल्याचे स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिष गोगावले यांनी सांगितले. या शिबिरास आळंदीकर नागरिक तसेच पंचक्रोशीतील युवक तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात २११ जणांनी रक्तदान केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एक आगळा वेगळा संकल्प करून अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले, शिवाय रक्ताची रुग्णांना लागणारी आवश्यकता, या बाबींचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील रक्त तुटवडा जाणवू नये, यासाठी स्वराज ग्रुप च्यावतीने रक्तदान शिबिराचा आदर्श इतर सेवाभावी संस्था, व्यक्ती यांनी घ्यावा असा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी शिबिराचे उदघाटन केले. या प्रसंगी शिवसेना नेते अशोक खांडेभराड, उत्तमराव गोगावले, तालुका प्रमुख रामदास धनवटे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक विलास घुंडरे, सचिन गिलबिले,आनंद मुंगसे, प्रशांत कुऱ्हाडे, रमेश गोगावले, माजी नगरसेविका शैला तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर, माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय वडगावकर, विलास कुऱ्हाडे,बाळासाहेब डफळ, कोमल काळभोर, संगिता पफाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली पानसरे, रोहन कुऱ्हाडे, शिरिष कारेकर, शशीराजे जाधव, स्वप्नील रंधवे, चारुहास रंधवे, सुदीप गरुड, गोविंद कुऱ्हाडे, प्रियेश रानवडे आदी उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांचे स्वराज ग्रुप तर्फे अध्यक्ष आशिष गोगावले यांनी विशेष आभार मानले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.