आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आळंदी पंचक्रोशीत विविध सामाजिक,शेक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा विषयक उपक्रम तसेच जनजागृती साठी शालेय मुलांची प्रभात फेरी बाईक रॅली असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असून, अमृत महोत्सवाचे उपक्रमातील ‘हर घर तिरंगा’ लावण्याचे समाज प्रबोधन उपक्रमात आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते ध्यास फाउंडेशनचे विश्वस्त गणेश गरुड, भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे आदींचे वतीने मोफत राष्ट्रध्वज वाटप करीत जनजागृती करण्यात आली.
१३ ते १५ ऑगस्ट या काळात घराघरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी तसेच शहरातील विविध शाळांनी प्रभात फेरी अंतर्गत तसेच शालेय कामकाजात मुलांमध्ये जागृती केली आहे. यासाठी नगरपरिषदेने शहरात अनेक ठिकाणी ध्वज विक्री करण्यासाठी विक्री केंद्रे सुरु करीत लोकांना आवाहन केले आहे. आळंदीत सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित असून या अमृत महोत्सव या निमित्त हार घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती करीत ध्वज मोफत वाटप इकच्छुक उमेदवारांनी एक प्रकारे निवडणूक संपर्क मोहीमच राबविली. यातून दोन्ही उद्धेश सफल होत असल्याने अनेक प्रभागात नागरिकांचे घरोघर जात मोफत ध्वज वाटप मोहीम सामाजिक बांधिलकीतून लांबविली. यास नागरिकांनी देखील प्रतिसाद देत ध्वज स्वीकारले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहनास प्रतिसाद देत आळंदीत देखील उपक्रम आळंदी शहर भाजपचे वतीने हर घर तिरंगा उपक्रमाचे आवाहन करण्यात आले. यासाठी आळंदी शहर भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, युवा मार्गदर्शक ध्यास फाउंडेशनचे विश्वस्त गणेश गरुड यांनी आळंदी आळंदी मंदिर परिसरात घरोघरी जाऊन तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप केले. हर घर तिरंगा उपक्रम संपूर्ण देश वासियांचा असून देशाप्रती अभिमान बाळगत नागरिकांनी परिसरात घरावर तिरंगा लावून या मोहिमेत सहभागी झाले. आळंदी पंचक्रोशीतील खाजगी, शासकीय शाळा, शासकीय संस्था, कार्यालये या ठिकाणी देखील ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. आळंदी परिसरात निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, मंडलाधिकारी स्मिता जोशी, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी सुनीता देशमाने यांचे माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आळंदीकर बांधवांचे वतीने १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता युवक तरुणांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली असून शहरातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्या नंतर सर्व नागरिकांनी दुचाकी वाहन रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश गरुड यांनी केले आहे.
पुणे जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, आळंदी नगरपरिषद शाळांत देखील अमृत महोत्सव निमित्त विविध शालेय उपक्रमांचे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. येथील ग्यानज्योत प्रशालेत पालकांना ध्वजाचे वाटप चेअरमन राजेंद्र घुंडरे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.