अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
खामगाव(ब्रेकिंग महाराष्ट्र):- गेल्या आठवडाभरापासून राज्यासह विदर्भात तसेच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपये मदत द्यावी यासह शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या विविध मागण्यासाठी खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तर जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झाली आहेत.अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने जमिनी खरडून निघाले आहेत तर पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत जिल्ह्यात तसेच खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी हजारो हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक विवांचनेत सापडला आहे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्यांना झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसाना करीता शेतकन्याच्या बंधावर जावुन तात्काळ रु. 50 हजार रुपये मदत करावी, खामगांव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक 150 च्या वर कमी आहेत ते शिक्षक तात्काळ वाढवून देणेबाबत व गोर गरीबाच्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे, रमाई घरकूल, पतप्रधान आवास योजना यांना लोखंड, सिमेंट, विटा यांची महागाई पाहता रु. 5 लाख रुपये अनुदान द्यावे, शेतकरी, शेतमजुर य कामगार कष्टकरी यांना ट्रॅक्टर, डिझेल, पेट्रोल व स्वयंपाक गॅस हा ५ रकमेवर उपलब्ध करून द्यावा, जिल्ह्यात सावकारी कायद्याची अंमलबजावणी करण्याकरीता स्वतंत्र जिल्हा उपनिबंधक नियुक्त करून दैनदिन सुनावनी करून शेतकन्यांना सावकारी मुक्त करण्यात याव्या. यासह विविध मागण्या एचडीएमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे. मागण्या तात्काळ मान्य झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे.
या निवेदनावर खामगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रकाश हेंड पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मिर्झा अकरम बेग, मोहन खताळ, संतोष बोचरे, अजीज खान, अखिल खान, मोहन फुटकळे, सुलतान मिर्झा, रईस देशमुख, राजेंद्र धनोकर,अशोक धुरंधर, रविंद्र धुरंधर, इब्राहिम खान, रामदास मोरखडे, खरपाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.