Breaking newsBuldanaVidharbha

खामगांवात आ.ॲड.आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक तिरंगा रॅली

खामगांव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त आज 12 ऑगस्ट 2022 रोजी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगांव शहरात भव्य़ तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी हजारो देशभक्त नागरीक या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम च्या जय घोषाने संपूर्ण शहर दुमदुमले. भाजपा कार्यालयासमोर रॅलीचा समारोप करण्याआधी आमदार ॲड .आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, विजयी विश्व़ तिरंगा प्यारा झेंडा उचा रहे हमारा , अमृत महोत्सवा निमित्त भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे या महोत्सवाचे औचित्य़ साधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाश दादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली.

सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले त्यांनतर रॅलीस प्रारंभ झाला. संपूर्ण शहरातील राष्ट्रसंत व महापुरुषांच्या पुतळयास या रॅली दरम्यान माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. सदरची रॅली खामगांव शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा येथून प्रारंभ अर्जुन जल मंदिर, लोकमान्य टिळक पुतळा, विकमशी चौक, चांदमारी चौक-शेगाव नाका, सामान्य रुग्णालया समोरून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हॉटेल ग्रीन पार्क, समोरून-भरत कटपीस, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, सराफा पोस्ट ऑफिस समोरून सावरकर चौक, पुरवार गल्ली, कालींका माता मंदिर-शिवाजी वेस-दंडे स्वामी मंदिर, घाटपुरी नाका, सुटाळपुरा, संताजी महाराज, पुतळ्या समोरून फरशी-शहीद भगतसिंग चौक, एकबोटे चौक, सकळकळे चौक, मोठी विहीर, केला पोस्ट ऑफिस, जलंब नाका, न्यायालया समोरून भाजपा कार्यालया समोर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार ॲड.आकाश फुंडकर म्हणाले आपल्या सर्वांच्या स्वातंत्रयासाठी ज्या देशभक्त़ शहिंदानी प्राणांची आहुती दिली त्यांची प्रेरणा घेऊन आपला हा तिरंगा असाच जगात उंच रहावा. “ विजयी विश्व़ तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा” असेही ते यावेळी म्हणाले. देशाची शान ही देशभक्तांवरच अवलंबून आहे. आज आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन येणाऱ्या पिढीला हि एक अविस्मरणीय भेट दिली आहे.

या रॅलीत महाराष्ट्र सोशल मिडीया सेलचे सहसंयोजक सागर फुंडकर, संजय शिनगारे, शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, शेगांव तालुकाध्यक्ष विजय भालतिडक, गजाननराव देशमुख जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष, राम मिश्रा, पवन गरड, ख वि सं अध्यक्ष शिवाभाऊ लोखंडकार, सर्व आघाडी अध्यक्ष, पदाधिकारी, नगर सेवक, जि.प.पं.स.सदस्य़, यांच्यासह हजारो देशभक्त़ नागरीक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!