नंदूरबार (आफताब खान) – राज्यातील सर्वाधिक कापूस उत्पादक म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला दर आणि इतर बाबींचा विचार केला असता, यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली असून कापूस लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यावर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात १ लाख १६ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. तर दुसरीकडे समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात ८५ टक्के पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. यावर्षी कापूस सोबतच तांदुळाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी.