बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलडाणा जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे स्वाईन फ्लू या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शहरातील इकबाल चौकात एका युवकाला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले असून, आरोग्य प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
बुलडाण्यात आढळलेला ३३ वर्षीय युवक मागील ४ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात भरती आहे. त्याचे लक्षणें पाहता दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, ही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याचा तपासणी अहवाल पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविण्यात आला होता. काल रात्री पुण्यावरून त्याचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालात सदरील युवकाला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सद्या या युवकाची प्रकृती स्थीर असून, कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलेले आहे. शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता पाहाता, जिल्हा आरोग्य विभागाने काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हा रोग कोरोनापेक्षाही अधिक गतीने संसर्गीत होतो, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.
Leave a Reply