Breaking newsHead linesPolitics

उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार!

– मुंबईत मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची गडबड
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन तब्बल ३८ दिवस झाले तरी राज्याला पूर्ण संख्येचे मंत्रिमंडळ नव्हते. विरोधक व जनतेचा दबाव निर्माण झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला आहे. रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या (दि.९) सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विधिमंडळ सचिवांनीदेखील अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनासंदर्भात ही बैठक बोलावलण्यात आल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या नियोजनाविषयीची चर्चा होऊही शकते. म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तारदेखील लवकरच करण्याची गडबड घाई मुंबईत सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, हा शपथविधी राजभवनाऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता असून, राजभवन व विधीमंडळ दोन्ही ठिकाणी तयारी सुरु झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्‍यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर १० ते १७ ऑगस्टदरम्यान राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची माहितीदेखील हाती आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात १० ते १२ मंत्री यावेळी शपथ घेतील अशीदेखील माहिती आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यात दाखल झाले होते. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत राज्याचे डोळे लागून होते. विरोधकांकडूनही वारंवार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवस झाले तरी राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही मंत्रिमंडळात असतील, असे राजकीय सूत्राने सांगितले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!