– अतिवृष्टीग्रस्त गावांची केली पाहणी, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील शेळगाव आटोळ व मेरा खुर्द महसूल मंडळातील गावांत ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदीकाठची व ओढ्याजवळची शेतजमीन खरडली गेली असून, हातातोंडाशी आलेला शेतीपिकांचा घास हिरवला गेला आहे. याबाबत माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना माहिती दिली असता, त्यांनी तहसीलदार व कृषी अधिकार्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार, या अधिकार्यांनी पंचनामे चालवले आहेत. महसूल विभागाच्या पर्जन्य मापकात ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर प्रत्यक्ष पाहणी केली असता १०० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना अटी व शर्तीच्या जाचात न अडकविता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गजानन वायाळ यांनी केली आहे.
तालुक्यातील शेलगाव अटोळ व मेरा खुर्द मंडळमधील देऊळगाव घुबे, भरोसा, पिंपळवाडी, मिसळवाडी, शेळगाव अटोळ इत्यादी गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, या पावसामुळे अतिशय चांगल्या अवस्थेत असलेल्या पिकाची व शेतीची प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठची ओढ्याजवळच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली आहे. शेतकऱ्याच्या तोंडचा घास या पावसामुळे हिरावून गेला आहे. या संदर्भात माजी मंत्री, आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना माहिती दिली असता, तहसीलदार अजित कुमार येळे व तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. परंतु महसूल मंडळात असणाऱ्या प्रजन्य मापाच्या नुसार मंडळामध्ये 55 मिमी पाऊस असल्यामुळे अतिदृष्टीसाठी 65 मि मी पाऊस पडायला हवा असे उत्तर महसूल विभागाकडून मिळत आहे. परंतु प्रत्यक्ष बांधावर जाऊन भरोसा, देऊळगाव घुबे, मिसाळवाडी इत्यादी गावामध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस आहे असे दिसून आले. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांना सोबत घेऊन पंचनामे करून घेतले व सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी केली. यावेळी गजानन वायाळ माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भरोसा येथील तलाठी उबरहंडे, शेख साहेब, कृषी सवडतकर मॅडम व तसेच शेवगाव आटोळ मंडळाचे मंडळाधिकारी काकडे व तलाठी भुतेकर व वरील गावातील कृष्णा मिसाळ, बाळासाहेब काळे, गणेश घुबे, शंकर बाप्पु थुटटे, भागवत थुटटे, अंकुश थुटटे , मिसाळवाडी येथील सरपंच बाळासाहेब मिसाळ, विलास मिसाळ, अशोक पाटील मिसाळ व नुकसान ग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.