BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

वंचित आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांना निवडणूक प्रक्रियेतूनच बाद करण्याचे राजकीय षडयंत्र उधळले?

- उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपावर अ‍ॅड. विनोद नरवाडे व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर जोरदार युक्तिवाद

– डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारातील मुसंडीची व लोकप्रियतेची विरोधकांच्या मनात बसली प्रचंड भीती!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज (दि.३०) पार पडली. या छाननीत शैलेश बावस्कर यांनी डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या नामांकन अर्जावर आक्षेप घेतला. परंतु, प्रसिद्ध वकील विनोद नरवाडे व शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद करून घेतलेला आक्षेप पुराव्यानीशी खोडून काढला. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी डॉ. ऋतुजा चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे विरोधकांनी रचलेले फार मोठे षडयंत्र संविधानाच्या चौकटीत उधळले गेल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. या घटनेतून डॉ. चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना आपला ढळढळीत पराभव दिसू लागला असल्याची जाणिव विरोधकांना होत असावी, असे दिसते.

सविस्तर असे, की मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या तरूण, तडफदार, उच्चशिक्षीत उमेदवार डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांची जनमाणसातील प्रसिद्धी बघून विरोधकांना भीती निर्माण झाली आहे. डॉ. चव्हाण यांच्यामुळे आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने विरोधक अक्षरशः हादरले असावेत. त्यामुळेच शैलेश बावस्कर यांच्या माध्यमातून डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला गेला. त्यातून त्यांच्याविरोधात मतदारसंघात व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र विरोधकांचा हा कुटील डाव फसला व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी डॉ. ऋतुजा चव्हाण यांचा निवडणूक अर्ज वैध ठरवला आहे. त्यासाठी अ‍ॅड. विनोद नरवाडे व शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या बाजूने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर अभ्यासपूर्ण युक्तिवाद करून आपली बाजू मांडली, व सदर आक्षेप हा निरर्थक ठरवला. त्यामुळे डॉ. ऋतुजाताई यांचा निवडणूक अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वीकृत करून वैध ठरवला. हा अर्ज वैध ठरल्याने डॉ. ऋतुजाताई यांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढण्यासाठी टपून बसलेल्या विरोधकांचे मात्र चांगलेच तोंड पडले. तर दुसरीकडे, अर्ज वैध ठरल्यानंतर डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.


विरोधकांच्या आक्षेपानंतरही कायद्याच्या कसोटीवर आपला अर्ज वैध ठरल्यानंतर उमेदवार डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी हा संविधानाचा विजय आहे, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र या घटनेने सिद्ध झाले की, डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यापासून विरोधकांची झोप उडाली आहे. कारण डॉ.चव्हाण यांनी शिक्षण, रोजगार व उद्योग या मुद्द्यांवर भर दिला असून, या मुद्द्यांना प्रत्युत्तर करण्यासाठी विरोधकांकडे ठोस मुद्देच नाहीत. या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर व तत्वावर राजकारण झाले पाहिजे. परंतु तसे न होता विरोधक हे भीतीपोटी मतदारांमध्ये अफवा व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, संविधानाची शक्ती डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने, तसेच शेतकरी चळवळ भरभक्कपणे पाठीशी असल्याने विरोधकांचे सर्व षडयंत्र निष्क्रिय ठरले आहे. डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांची चांगलीच धास्ती विरोधकांनी घेतलेली असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.

मेहकर मतदारसंघात खरी लढत डॉ. ऋतुजा चव्हाण व आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्यातच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!